शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
7
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
8
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
9
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
10
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
11
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
12
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
13
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
14
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
15
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
16
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
18
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
19
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
20
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी

संतापजनक!: पाकिस्तानची नवी चाल; करतारपूर गुरुद्वाराच्या देखभालीपासून शीख बांधवांना हटवलं, तयार केली नवी संस्था

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 05, 2020 9:16 AM

विशेष म्हणजे, करतारपूर गुरुद्वाराची जबाबदारी ज्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट यूनिटला सोपवण्यात आली आहे. त्यातील सर्वच्या सर्व ९ सदस्य Evacuee Trust Property Board (ETPB)शी संबंधित आहेत.

ठळक मुद्देइम्रान सरकारने गुरुद्वाराच्या देखभालीचे काम पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीकडून काढून ते एका नव्या संस्थेकडे दिले आहे.आता करतारपूर गुरुद्वाराची जबाबदारी प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट यूनिटकडे सोपवण्यात आली आहे.गुरुद्वाराच्या देखभालीसाठी तयार करण्यात आलेल्या या संस्थेत एकही शीख संदस्य नाही.

इस्लामाबाद - करतापूर गुरुद्वारासंदर्भात पाकिस्तानची नवी चाल समोर आली आहे. पाकिस्तानातील इम्रान सरकारने गुरुद्वाराच्या देखभालीचे काम पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीकडून काढून ते एका नव्या संस्थेकडे दिले आहे. विशेष म्हणजे गुरुद्वाराच्या देखभालीसाठी तयार करण्यात आलेल्या या संस्थेत एकही शीख संदस्य नाही. आता करतारपूर गुरुद्वाराची जबाबदारी प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट यूनिटकडे सोपवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, करतारपूर गुरुद्वाराची जबाबदारी ज्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट यूनिटला सोपवण्यात आली आहे. त्यातील सर्वच्या सर्व ९ सदस्य Evacuee Trust Property Board (ETPB)शी संबंधित आहेत. एवढेच नाही तर, असेही सांगण्यात येते, की पाकिस्तानी गुप्तचरसंस्था आयएसआय ETPBला कंट्रोल करते.

प्रोजेक्ट मॅनेजमेंट यूनिटचा सीईओ मो. तारिक खानला करण्यात आले आहे. पाकिस्तान सरकारने करतारपूर गुरुद्वारासंदर्भात जारी केलेल्या आदेशात गुरुद्वाराच्या माध्यमाने व्यापार करण्याची योजना आहे. या आदेशात प्रोजेक्ट बिझनेस योजनेचाही उल्लेख आहे. अर्थात या गुरुद्वारापासून पैसा कमावण्याचा इम्रान सरकारचा इरादा आहे.

काय आहे करतारपूर कॉरिडोर -शीखांच्या पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक असलेले करतारपूर साहीब हे गुरुनानक देवांचे निवास स्थान म्हणून ओळखले जाते. पाकिस्तानात असलेल्या या ठिकाणीच गुरुनानक देवांनी अखेरचा श्वास घेतला होता. पूर्वी शीख बांधव दूर्बीणीच्या सहाय्यानेच करतारपूर गुरुद्वाराचे दर्शन करायचे. मात्र, भारत-पाकिस्तान सरकारने एकत्रितपणे कॉरिडोर तयार केला आहे.

भारतातील पंजाबमधील डेरा बाबा नानकपासून आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत कॉरिडोरची निर्मिती करण्यात आली आहे. तर पाकिस्ताननेही सीमेपासून नारोवाल जिल्ह्यातील गुरुद्वारापर्यंत कॉरिडोर तयार केला आहे. यालाच करतारपूर साहीब कॉरिडोर म्हणून संबोधले जाते. करतारपूर कॉरिडोरसंदर्भात पाकिस्तानची चाल अनेक वेळा समोर आली आहे.

टॅग्स :Kartarpur Corridorकर्तारपूर कॉरिडोरPakistanपाकिस्तानsikhशीखIslamइस्लाम