Pakistan Bomb Blast: पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये भीषण बॉम्बस्फोट, ३ जवानांचा मृत्यू; २० जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 12:03 IST2021-09-05T12:03:12+5:302021-09-05T12:03:36+5:30
Pakistan Bomb Blast: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात रविवारी सकाळी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

Pakistan Bomb Blast: पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये भीषण बॉम्बस्फोट, ३ जवानांचा मृत्यू; २० जण जखमी
Pakistan Bomb Blast: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात रविवारी सकाळी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. स्फोटात ३ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून जवळपास २० जण जखमी झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार बलूचिस्तानच्या मास्तुंग रोड परिसरातील एका चेकपोस्टवर आत्मघाती हल्ला झाला आहे.
बलूचिस्तानच्या दहशवादविरोधी विभागानंही या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. सोहाना खान एफसी चेकपोस्ट दहशतवाद्यांचा निशाण्यावर होती, असं दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. तर सीटीडीचं पथक देखील घटनास्थळावर पोहोचला असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.