pakistan prime minister imran khan tweet on jammu kashmir unsc resolutions Kashmir Solidarity Day | UNSC च्या ठरावांप्रमाणे काश्मीरवर तोडगा निघावा; पाकिस्तान शांततेसाठी तयार : इम्रान खान

UNSC च्या ठरावांप्रमाणे काश्मीरवर तोडगा निघावा; पाकिस्तान शांततेसाठी तयार : इम्रान खान

ठळक मुद्देपाकिस्तानात करण्यात आलं 'काश्मीर सॉलिडॅरिटी डे'चं आयोजनयापूर्वी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनीही केलं होतं शांततापूर्ण वातावरणात चर्चा करण्याचं वक्तव्य

आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्ताननं पुन्हा एकदा जम्मू काश्मीरचा मुद्दा उचलला आहे. शुक्रवारी पाकिस्तानचेपंतप्रधानइम्रान खान यांनी यासंदर्भात काही ट्वीट्स केली. तसंच गेल्या सात दशकांपासून भारतानं काश्मीरच्या लोकांचा आवाज दाबला असल्याचं म्हणत पाकिस्तान कायमच काश्मीरच्या लोकांची साथ देईल असं म्हटलं. 

इम्रान खान यांनी शुक्रवारी यासंदर्भात लोगापाठ काही ट्वीट केली. संयुक्त राष्ट्राच्या नियमांनुसाप पाकिस्तान जम्मू काश्मीवरवरील तोडगा काढू इच्छित असल्याचं ते यावेळी म्हणाले. काश्मीरची नवी पीढी आपली लढाई लढत आहे आणि पाकिस्तान कायम त्यांच्यासोबत आहे. पाकिस्तान आपल्या बाजूनं शांततेसाठी दोन पावलं पुढे येण्यास तयार असल्याचंही इम्रान खान यांनी नमूद केलं. जम्मू काश्मीरचा मुद्दा पुन्हा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आणण्यासाठी शुक्रवारी पाकिस्तानकडून 'काश्मीर सॉलिडॅरिटी डे'चं आयोजन करण्यात आलं आहे. या अंतर्गत पाकिस्तानच्या निरनिराळ्या भागांमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 'काश्मीर सॉलिडॅरिटी डे'च्या दिवशी काश्मीरच्या नागरिरांसोबत पाकिस्तान उभा असल्याचं मी पुन्हा सांगू इच्छितो असं इम्रान खान यांनी ट्वीटमध्ये म्हटलं. काश्मीरच्या लोकांच्या संघर्षाची UNSC च्या अनेक प्रस्तावांमध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पुष्टी करण्यात आली आहे. गेल्या सात दशकांपासूनचा कब्जा आणि त्रासदेखील काश्मीरी लोकांचं संघर्ष कमकुवत करू शकला नाही. आता काश्मीरी लोकांची तरूण पीढी संघर्षाला अधिक सकल्पानुसार पुढे नेत असल्याचं त्यांनी नमूद केलं. 

यापूर्वीही अनेकदा काश्मीरवर भाष्य

यापूर्वीही अनेकदा इम्रान खान यांनी आपल्या कार्यकाळात काश्मीरचा मुद्दा उचलला होता. आपल्या भाषणात किंवा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. परंतु प्रत्येक वेळी त्यांना तोंडावर पडण्याची वेळ आली होती. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि त्यावर कोणताही चर्चेचा विषय नाही हे भारतानं यापूर्वीच स्पष्ट केलं होतं. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांनी आपल्या काश्मीरवरील वक्तव्यावरून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतरच लगेच इम्रान खान यांचे हे ट्वीट आले आहेत. "कोणत्याही क्षेत्राच्या सर्व समस्यांचा तोडगा हा शांततामय वातावरणात झाला पाहिजे. ज्यामुळे मैत्रीचा हात पुढे करता येऊ शकेल," असं बाजवा म्हणाले होते. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: pakistan prime minister imran khan tweet on jammu kashmir unsc resolutions Kashmir Solidarity Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.