पाकिस्तानकडून युद्धाची तयारी?;भारतीय सीमेजवळ एअरफिल्ड बांधले, चिनी तोफखानाही तैनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 18:11 IST2023-12-27T18:08:52+5:302023-12-27T18:11:00+5:30
पाकिस्तानी अधिकारी किंवा लष्करी लोक याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य देत नाहीत.

पाकिस्तानकडून युद्धाची तयारी?;भारतीय सीमेजवळ एअरफिल्ड बांधले, चिनी तोफखानाही तैनात
पाकिस्ताननेभारतीय सीमेपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर नवीन एअरफील्ड बांधले आहे. याशिवाय चीनमधून आयात केलेली SH-15SP हॉवित्झर तोफही तैनात केली आहे. ही एअरफील्ड लाहोरजवळ आहे. या एअरफील्डचा वापर कसा केला जाईल, हे सध्या तरी समोर आलेलं नाही.
पाकिस्तानच्या या दोन कारवायांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच यामुळे भारतीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानी अधिकारी किंवा लष्करी लोक याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य देत नाहीत. काही लोक म्हणतात की, ही फ्लाइट ट्रेनिंग स्कूल बांधली जात आहे. ज्याचा वापर पाकिस्तानचे लष्कर करणार आहे.
हेलिकॉप्टर, ड्रोन आणि इतर विमानांसाठी या एअरफील्डचा वापर केला जाईल, असेही मानले जात आहे. सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे चीन आणि तुर्कस्तानमधून आयात केलेल्या अॅटॅक ड्रोनसाठी या एअरफील्डचा वापर केला जाईल. कारण हे एअरफील्ड भारतीय सीमेपासून फक्त २० किमी अंतरावर आहे. येथून यूएव्ही लाँच करणे सोपे होईल.
पाकिस्तानी लष्कराने आपल्या २८व्या आणि ३२व्या आर्टिलरी रेजिमेंटमध्ये चीनमधून आयात केलेल्या तोफा भरल्या आहेत. पाकिस्तानने चीनकडून SH-15 सेल्फ-प्रोपेल्ड (SP) खरेदी केली होती. चीनने त्याला या तोफा स्वस्तात दिल्या होत्या. या दोन्ही रेजिमेंट पाकिस्तानच्या दुसऱ्या तोफखाना विभागात आहेत. जो भारताच्या पंजाब आणि राजस्थान सीमेजवळ सक्रिय राहतो. SH-15SP ही चीनने बनवलेली अत्याधुनिक हॉवित्झर तोफा आहे. २०१९मध्ये पाकिस्तानने चीनकडे अशा २३६ तोफा मागितल्या होत्या. सध्या पाकिस्तानकडे ४२ तोफ आहेत. जे पाकिस्तानने आपल्या आर्मी डे परेडमध्ये लोकांसमोर दाखवले होते.