शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Imran Khan Calls Bill Gates: इम्रान खान यांनी अफगाणिस्तानसाठी थेट बिल गेट्स यांच्याकडे मागितली मदत, म्हणाले माणुसकी खूप गरजेची!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 10:07 IST

Imran Khan Calls Bill Gates: पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांनी अफगाणिस्तानसाठी (Afghanistan) खूप चिंताग्रस्त झाले आहेत.

पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांनी अफगाणिस्तानसाठी (Afghanistan) खूप चिंताग्रस्त झाले आहेत. इम्रान खान यांनी आता मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि अब्जाधीश बिल गेट्स (Bill Gates) यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. माणुसकीच्या नात्यातून अफगाणिस्तानला आर्थिक सहाय्य करा अशी विनंती इम्रान खान यांनी बिल गेट्स यांच्याकडे केली आहे. १५ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानात तालिबाननं कब्जा केला आहे. तेव्हापासून अफगाणिस्तानला होणारा अर्थपुरवठा विविध कारणांमुळे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानची आर्थिक स्थिती खूप डबघाईला आली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार इम्रान मलिक यांनी बिल गेट्स यांच्यासोबत फोनवरुन संवाद साधला. गेट्स सध्या बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन या संस्थेचे अध्यक्ष आहेत. इम्रान खान यांनी यावेळी पोलिओचं समूळ उच्चाटन करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांबाबत गेट्स यांच्याशी चर्चा केली. यासोबत पाकिस्तानमधील कुपोषणाचा आकडा कमी करण्यासाठी आणि वित्तीय सेवांसाठी गेट्स यांच्या संस्थेकडून होणाऱ्या मदतीबाबतही चर्चा केली. 

पाकिस्तानच्या जिओ टीव्हीच्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी फोनवरुन पंतप्रधान इम्रान खान यांनी गेट्स यांच्याशी संपर्क केला. यात अफगाणिस्तान या युद्धग्रस्त देशात अर्ध्याहून अधिक लोकसंख्या गरीबी रेषेच्या खाली गेली असल्याचं सांगितलं. त्यांना अर्थसाहय्याची खूप गरज आहे. पंतप्रधान कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार इम्रान यांनी अफगाणिस्तानच्या आरोग्य प्रणालीबाबतही गेट्स यांच्यासोबत चर्चा केली. त्यांच्या दाव्यानुसार जगात अजूनही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पोलिओचा धोका कायम आहे.

तालिबानसोबत चर्चा हाच एकमेव मार्गअफगाणिस्तानात शांती आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी तालिबानसोबत चर्चा हाच सर्वोत्तम मार्ग आहे असं इम्रान खान यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. महिलांचे अधिकार आणि विशिष्ट पद्धतीनं सरकार चालवण्यासंदर्भात तालिबानसोबत चर्चेतूनच मार्ग निघू शकतो. हाच एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे, असंही ते म्हणाले. तालिबानला थोडा वेळ देण्याची गरज आहे. त्यांना मदत मिळाली नाही, तर ते पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीतीही खान यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानBill Gatesबिल गेटसAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान