शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

Pakistan Plane Crash : विमान अपघातात 97 ठार, दोघे वाचले; 'ते' भीषण दृश्य CCTV ने टिपले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 10:28 IST

Pakistan Plane Crash : लाहोरहून कराचीला जाणारं विमान कराची विमानतळावर उतरण्याच्या आधी अपघातग्रस्त झालं. विमानतळाजवळ असणाऱ्या रहिवाशी भागात विमान कोसळलं

कराची - पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानाला शुक्रवारी (22 मे) भीषण अपघात झाला आहे. लाहोरहून कराचीला जाणारं हे विमान कराची विमानतळावर उतरण्याच्या आधी अपघातग्रस्त झालं. विमानतळाजवळ असणाऱ्या रहिवाशी भागात विमान कोसळलं असून यामध्ये तब्बल 97 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण यातून वाचले असल्याची माहिती मिळत आहे. पीआयएचे हे विमान कॅप्टन सज्जाद गुल उडवत होते. पाकिस्तानातील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान उतरण्याच्या बरोबर 10 मिनिटे आधी, विमानात तांत्रिक समस्या असल्याचे पायलटने सांगितले होते. यादरम्यान, एअर ट्राफिक कंट्रोल आणि पायलट यांच्यातील अखेरच्या संभाषणाचं रेकॉर्डिंगदेखील समोर आलं आहे. 

एअरबस ए320च्या पायलटचे रेकॉर्ड झालेले अखेरचे शब्द "विमानाचे इंजिन काम करत नाही," असे होते. त्यानंतर आता या विमान अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. लाहोरहून कराचीला जाणारे हे विमान पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे (पीआईए) होते. विमान रनवेपासून फक्त एक किलोमीटर दूर असताना हा भीषण अपघात झाल्याची माहिती आता समोर आली आहे. विमानतळाजवळ असणाऱ्या रहिवाशी भागात विमान कोसळलं. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. याच परिसरातील एका इमारतीवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान कोसळतानाचे दृष्य कैद झाले आहे. अनेकांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला असून तो जोरदार व्हायरल होत आहे. 

अपघाताच्या बरोबर 10 मिनिटे आधीच पायलटचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला होता. कराची एअरपोर्टवर लँडिंगपूर्वी पायलट म्हणाला, 2 राउंड घेतल्यानंतर लँडिंग करू. मात्र यानंतर विमानाला अपघात झाला. अपघातापूर्वी पायलटने लँडिंग गिअर ओपन करण्याचाही प्रयत्न केला. मात्र ते ओपन होऊ शकले नाही. पाकिस्तानातील एका वृत्तानुसार, पायलटची लँडिंग करण्याची इच्छा होती. मात्र, व्हिल ओपन हेत नव्हते. त्यामुळे त्याला काही वेळ विमान वरच उडवत राहावे, असे सांगण्यात आले होते. मात्र, याच दरम्यान ते क्रॅश झाले.

पाकिस्तानचे अध्यक्ष अरीफ अल्वी, पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करप्रमुख जन. कमर जावेद बाजवा यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी दुर्घटनेची तातडीने चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. लष्करप्रमुख बाजवा यांनी लष्कराला मदत आणि बचाव कार्यासाठी नागरी प्रशासनाला मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : अरे व्वा! 100 वर्षांच्या आजींनी जिंकलं 'कोरोना युद्ध'; टाळ्यांचा गजरात झालं स्वागत

CoronaVirus News : तंत्रज्ञानाची किमया! 'हे' खास हेल्मेट घेणार कोरोना व्हायरसचा शोध; जाणून घ्या खासियत

CoronaVirus News : कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला तर शवविच्छेदनाची गरज आहे का?; ICMRने दिली महत्त्वाची माहिती

CoronaVirus News : आनंदाची बातमी! कोरोनाने थैमान घातलेलं असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी

CoronaVirus News : 'ड' जीवनसत्त्वामुळे कोरोनावर करता येते मात?, शास्त्रज्ञ म्हणतात...

कुटुंब रुग्णालयात एकत्र झालं दाखल पण घरी परतली फक्त आई; मन सुन्न करणारी घटना

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात भूतदया! हेच असतं आईचं प्रेम; फोटो व्हायरल

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAccidentअपघातDeathमृत्यूairplaneविमानAirportविमानतळ