भारतासोबतचा पंगा पाकिस्तानला महागात! चहा प्यायचेही वांदे; खिशाला जबर फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 03:15 PM2021-10-14T15:15:43+5:302021-10-14T15:16:16+5:30

पाकिस्तानात महागाईमुळे लोकांचं पुन्हा एकदा लोकांचं जगणं कठीण झाले आहे. चहा पिण्यासाठीही लोकांना करावा लागतोय विचार

pakistan people are frustrated with inflation as the price of tea is going very high | भारतासोबतचा पंगा पाकिस्तानला महागात! चहा प्यायचेही वांदे; खिशाला जबर फटका

भारतासोबतचा पंगा पाकिस्तानला महागात! चहा प्यायचेही वांदे; खिशाला जबर फटका

Next
ठळक मुद्देचहा पिण्यासाठीही लोकांना करावा लागतोय विचार

पाकिस्तानात महागाईमुळे लोकांचं पुन्हा एकदा लोकांचं जगणं कठीण झाले आहे. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पाकिस्तानात गेल्या वर्षभरात महागाईदेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. केवळ शहरांमध्येच नाही, तर गावखेड्यांमध्येही मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. दरम्यान, आता पाकिस्तानात लोकांना चहाची चवदेखील कडवट लागू लागली आहे. भारताशी पंगा घेणं पाकिस्तानला महागात पडताना दिसत आहे. दरम्यान, पाकिस्तानला भारताकडून साखरे मिळणं शक्य होतं, परंतु त्यांनी भारताकडून साखर आयात करण्यास नकार दिला.

पाकिस्तानातील रावळपिंडी येथे लोकांना चहा पिताना दहा वेळा विचार करावा लागत आहे. या ठिकाणी एक कप चहाची किंमत तब्बल ४० रूपये इतकी झाली आहे. एक कप चहाची किंमत यापूर्वी ३० रूपये होती. परंतु आता ती ४० रूपये झाली आहे. नुकतीच पुन्हा एकदा चहाच्या दरात वाढ करण्यात आली. चहा पावडर, दुध, साखर आणि गॅसच्या दरात झालेल्या वाढीमुळे गेल्या काही दिवसांमध्ये चहाच्या किंमतीत ३५ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती एका चहावाल्यानं पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉनशी बोलताना दिली.

दुध १२० रूपये लीटर
त्या व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानात दुधाचे दर १०५ रूपयांवरून वाढून १२० रूपये प्रति लीटर इतके झाले आहेत. याशिवाय चहा पावडरही ८०० ते ९०० रूपये आणि गॅस सिलिंडर १५०० ते ३ हजार रूपये झाले आहेत. महागाईमुळे कमाईवर मोठा परिणाम झाला आहे. परंतु चगाटे दर वाढवण्याव्यतिरिक्त अन्य कोणताही पर्याय आपल्याकडे नसल्याचं त्यांन सांगितलं. तर दुसरीकडे आणखी एका चहावाल्यानं आपली एका दिवसाची कमाई २६०० रूपये होती असं सांगितलं. परंतु संपूर्ण नफा पाहिला तर आपल्याला केवळ १५ रूपये फायदा होत होता. त्यामुळे जगणं अशक्य होतं. म्हणूनच चहाचे दर वाढवण्याचे प्रयत्न केल्याचं त्यानं सांगितलं.

म्हणून जनता संकटात
पाकिस्तानी सरकारचे निर्णय पाकिस्तानच्या जनतेच्या अंगलट येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तानद्वारे मागवण्यात आलेल्या साखरेची २८,७६० टनाची खेप पाकिस्तानात पोहोचली. या साखरेसाठी त्यांनी तब्बल ११० रूपये प्रति किलो दर मोजला. तर दुसरीकडे टीसीपीनं एक लाख टन साखर इम्पोर्ट केली होती. तेव्हा त्याचेदर जवळपास ९० रूपये प्रति किलो होते. भारतीय अधिकाऱ्यांनुसार पाकिस्तानला हवं असतं तर त्यांना कमी किंमतीतही साखरेचा पुरवठा होऊ शकला असता.

Web Title: pakistan people are frustrated with inflation as the price of tea is going very high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app