शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Pakistan: भारताचे आक्रमक रुप पाहून पाकिस्तान घाबरला, लष्कराबाबत घेतला चकीत करणारा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 17:53 IST

Pakistan: पाकिस्तान आपल्या बजेटचा मोठा हिस्सा दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी खर्च करतो. या कृतींमुळे तो बऱ्याच काळापासून FATF च्या 'ग्रे' लिस्टमध्ये आहे. अशा स्थितीत स्वत:च्या सुरक्षेच्या नावाखाली घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे..

Pakistan defence budget: आपल्या ढासळत चाललेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्याऐवजी पाकिस्तानने एक असा निर्णय घेतलाय, ज्याने संपूर्ण जग चकीत झालंय. आधीच प्रचंड आर्थिक संकट आणि कर्जाच्या गर्तेत अडकलेल्या पाकिस्तानच्या नवीन शाहबाज सरकारने संरक्षण बजेट वाढवण्याची घोषणा केली आहे.

पाक सैन्य 1400 अब्जातून अधिक मजबूत होईल?शाहबाज शरीफ सरकारच्या या निर्णयामुळे पाकिस्तानी लष्कर आणि इतर सशस्त्र दलांना पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात 1,400 अब्ज रुपये ($7.6 अब्ज) पेक्षा जास्त मिळण्याची अपेक्षा आहे. नुकतीच करण्यात आलेली दरवाढ चालू वर्षाच्या संरक्षण बजेटपेक्षा सुमारे 83 अब्ज रुपये अधिक असेल. मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे. सहसा, अर्थसंकल्पाच्या घोषणेच्या वेळी, सर्वांच्या नजरा संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतूदीकडे असतात.

एका सैनिकावर वर्षाला 26.5 लाख खर्च 'द डॉन' वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, सशस्त्र दलांसाठी 1,453 अब्ज रुपयांचे वाटप गेल्या वर्षीच्या 1,370 अब्ज रुपयांच्या वाटपाच्या तुलनेत सुमारे 83 अब्ज रुपये अधिक असेल. यात सुमारे 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. संरक्षण अर्थसंकल्पातील ही वाढ मुख्यत्वे कर्मचार्‍यांशी संबंधित खर्च, पगार आणि भत्त्यांवर खर्च केली जाईल, असे या अहवालात म्हटले आहे. सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तानमधील प्रत्येक जवानावर होणारा वार्षिक खर्च 26.5 लाख रुपये आहे, जो भारताच्या खर्चाच्या एक तृतीयांश भागही नाही.

अर्थव्यवस्थेची काळजी करू नकाआकडेवारीनुसार, पुढील आर्थिक वर्षात पाकिस्तानचे संरक्षण बजेट एकूण खर्चाच्या 16 टक्के असेल. सकल देशांतर्गत उत्पादनातील (जीडीपी) वाटा पाहता, तो चालू वर्षात 2.54 टक्क्यांवरून 2.2 टक्क्यांवर येईल. दरम्यान, इस्लामाबादच्या प्रत्येक नापाक कृत्याला आणि हालचालींना भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानातील तालिबानी सैनिकांचे कडवे आव्हानही त्यांच्या सैनिकांना आहे. अशा स्थितीत गळ्यापर्यंत कर्जबाजारी होऊनही पाकिस्तान संरक्षण बजेट वाढवून स्वत:च्या भल्याची स्वप्ने पाहत आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानDefenceसंरक्षण विभाग