शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

पाकची सेना भारताबरोबर युद्धाच्या स्थितीत नाही, पाकमधल्या संरक्षणतज्ज्ञाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 2:09 PM

भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाक नेहमीच भारताला युद्धाच्या धमक्या देत असतो.

इस्लामाबादः भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाक नेहमीच भारताला युद्धाच्या धमक्या देत असतो. पाकिस्तानच्या त्याच धमकीची आता पाकिस्तानमधल्या संरक्षणतज्ज्ञ लेखिका आयशा सिद्दिकी यांनी पोलखोल केली आहे. आमचा देश भारताशी युद्ध करण्याच्या तयारीत नाही. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या गंभीर मंदीचा सामना करत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या चलनातही वारंवार घसरण होत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान भारतबरोबर युद्ध करू शकत नाही. तसेच मी माझ्या पाकव्याप्त काश्मीरमधल्या एका मित्राला विचारलं की, पाकिस्तान भारताशी युद्ध छेडू शकतो का, तर तो बोलला पाकिस्तानच्या सेनेचा पराभव होईल.पाकिस्तानमधल्या सामान्य व्यक्तीलाही वाटतं की पाकिस्ताननं युद्ध छेडल्यास त्यांचा पराभव अटळ आहे. तत्पूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला युद्धाची धमकी दिली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी ट्विट करुन काश्मीर प्रश्नावर जगातील देशांनी वेळीच लक्ष दिलं नाही तर जगातील मुस्लिमांना कट्टरता वाढून हिंसाचाराला बळ मिळेल असा दावा केला आहे. कलम 370 हटविल्यानंतर बिथरलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, हे जग काश्मीरमध्ये मुस्लिमांवर होणारा अन्याय बघत राहणार का? जिहादच्या नावाखाली पाकिस्तानकडून जगातील अन्य देशांना घाबरविण्याचा प्रकार सुरु झाला आहे. जर जगाने काश्मीर प्रश्नी वेळीच लक्ष दिलं नाही तर त्याचे परिणाम गंभीर होतील, त्याचे पडसाद जगातील मुस्लिमांवर होऊन कट्टरता वाढेल आणि हिंसाचाराला सुरुवात होईल. भारताने 5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 संविधानातून हटविण्याचा आणि जम्मू काश्मीरचं विभाजन करुन लडाख हे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्याचं जाहीर केले. भारताच्या या ऐतिहासिक निर्णयावर पाकिस्तानकडून विरोध होऊ लागला. त्यामुळे जगभरातील देशांकडून पाठिंबा मिळावा यासाठी पाकच्या पंतप्रधानांनी प्रयत्न सुरु केले मात्र त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात जर युद्ध झालं तर त्यासाठी जगातील अन्य देश जबाबदार असतील असं वक्तव्य केलं. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताकडून मोठी कारवाई होऊ शकते या भीतीने पाकिस्तानमध्ये घबराट पसरली आहे. तर दुसरीकडे भारताला युद्धाची धमकी देत आहे. भारतानं असं काही केल्यास आम्हीही युद्ध करण्यासाठी सज्ज असल्याचं इम्रान खान म्हणाले होते. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान