शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
5
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
6
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
7
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
8
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
9
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
10
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
11
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
12
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
13
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
14
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
15
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
16
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
17
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
18
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
19
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
20
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप

Pakistan On Srinagar Sharjah Flight : आमच्या हवाई हद्दीचा वापर करू नका; श्रीनगर-शारजाह उड्डाणावर पाकिस्तान भडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 14:32 IST

Pakistan Closed Air Space for India Flight : श्रीनगर ते शारजाह अशा सुरू झालेल्या विमान सेवेवरून पाकिस्तानचा रागराग.

Pakistan Closed Air Space for India Flight : अनेकदा तोंडघशी पडूनही पाकिस्तान आपल्या नापाक कारवायांपासून बाहेर येत नाही. श्रीनगर ते शारजाह दरम्यान सुरू करण्यात आलेल्या विमानसेबेवरून आता पाकिस्तानला राग अनावर झाल्याचं दिसून येत आहे. पाकिस्ताननं या विमानाच्या आपल्या हवाई हद्दीतून उड्डाणास बंदी घातली आहे. त्यामुळे आता या विमानाला लांब फेरा घेऊन शारजाहला जावं लागत आहे.

काश्मीरमधून ही विमानसेवा सुरू झाल्यामुळे पाकिस्ताननं संताप व्यक्त केला असल्याचं म्हटलं जात आहे. यापूर्वीही काश्मीरमधून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी आपली हवाई हद्द वापरण्यास पाकिस्ताननं बंदी घातली होती. दरम्यान, पाकिस्ताननच्या आपली हवाई हद्द वापरण्यास बंदी घातल्याचा प्रकार हा दुर्देवी असल्याची प्रतिक्रिया जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली. "हे अतिशय दुर्देवी आहे. २००९-१० मध्ये श्रीनगर येथून दुबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाबाबतही पाकिस्ताननं असंच केलं होतं. मला आशा होती की गो फर्स्टच्या विमानाला देण्यात आलेली मंजुरी ही दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याचे संकेत होतं. परंतु असं व्हायचं नव्हतं," अशी प्रतिक्रिया ओमर अब्दुल्ला यांनी दिली.

गो फर्स्टनं सुरू केली होती सेवाकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २३ ऑक्टोबर रोजी श्रीनगर-शारजाह विमानाला हिरवा झेंडा दाखवला होता. गो फर्स्टनं ही सेवा सुरू केली होती. श्रीनगर ते शारजाह अशी थेट आंतराष्ट्रीय उड्डाण आमइ कार्गो सेवा देणारी ही पहिली विमान कंपनी आहे. या दोन ठिकाणांदरम्यान आठवड्याला चार विमानांचं उड्डाण केलं जाणार आहे. दरम्यान, पाकिस्तानी हवाई हद्दीतील उड्डाणासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती असा दावा पाकिस्तानी माध्यमांकडून करण्यात आला होता. त्यानंतर पाकिस्तानचे माजी राजदूत अब्दुल बासित यांनी यावरू इम्रान खान सरकारला घेरलं होतं. विमान कंपनीनं पाकिस्तानची परवानगी घेतली होती का नाही हे पाकिस्तानचं सरकारच सांगू शकेल असंही ते एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानSrinagarश्रीनगर