शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

पाकिस्तानवर IMFहून चीनचं अधिक कर्ज, बेल्ट अँड रोड प्रोजेक्ट संकटात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 9:01 AM

चीनला आपला मित्र समजणारा पाकिस्तान मोठ्या प्रमाणात कर्जात बुडालेला आहे.

इस्लामाबाद: चीनला आपला मित्र समजणारा पाकिस्तान मोठ्या प्रमाणात कर्जात बुडालेला आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्तानवर आयएमएफनं दिलेल्या कर्जाहून चीनकडून घेतलेल्या कर्जाचा बोजा दुप्पट आहे. पाकिस्तान हा चीनच्या कर्जात आकंठ डुबलेला असून, कर्जाची रक्कम दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. वाढत्या कर्जामुळे पाकिस्तानसमोर परकीय चलनाचंही मोठ संकट उभं राहिलं आहे.आयएमएफनुसार, पाकिस्तानला जून 2022पर्यंत चीनकडून घेतलेलं 6.7 अब्ज डॉलरच्या कर्जाची परतफेड करावी लागणार आहे.  ब्लूमबर्ग रिपोर्टनुसार, आयएमएफनं 2022मध्ये पाकिस्तानच्या प्रस्तावित एक बेलआऊट पॅकेजला मंजुरी दिली आहेत. तसेच पाकिस्तानला इतर कर्जांसाठी 2.8 अब्ज डॉलरची गरज आहे. चीनच्या बेल्ट अँड रोड प्रोजेक्टमध्ये सहभागी असलेल्या पाकिस्ताननं कर्जाच्या संकटातून उभारी घेण्यासाठी चीनकडूनच मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं आहे. चीनकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात घेतलेल्या कर्जामुळे पाकिस्तान वेगळ्याच संकटात सापडला आहे.  कराचीतल्या ऑप्टिमस कॅपिटल मॅनेजमेंट हाफिज फैजान अहमद म्हणाले, बेल्ट अँड रोड प्रोजेक्टची सुरुवात केल्यानंतरच पाकिस्तानच्या कर्जाच्या रकमेत वाढ झालेली आहे. दोन वर्षांपूर्वी चीनकडून घेतलेल्या कर्जात वारंवार वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पाकिस्तान आणखी कर्जे घेत सुटला आहे. त्यामुळे तो दिवसेंदिवस कर्जाच्या फेऱ्यात अडकतो आहे. दुसरीकडे गेल्या वर्षी सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानचा बेल्ट अँड रोड प्रोजेक्टमुळे संकटात सापडलेल्या देशांमध्ये सामील करण्यात आलेलं होतं. सेंटर फॉर स्टडी ऑफ पाकिस्तानच्या मेंबर बुरजिन वाघमर म्हणाले, आता चीनकडून घेतलेलं कर्ज हे पाकिस्तानच्या गळ्यात अडकलेला काटा ठरतो आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान