शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही तालिबानचे संरक्षक, त्यांच्यासाठी सर्वकाही केलं, त्यांना…."; पाकिस्तानी मंत्र्याची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 12:38 IST

Pakistan minister sheikh rashid statement on taliban support imran khan government : पाकिस्तानच्या इमरान खान सरकारमध्ये मंत्री असलेल्या शेख राशिद यांनी आता सर्वांसमोर जाहीरपणे तालिबानचं समर्थन केलं आहे.

अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर तालिबानींनी कब्जा केल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी देशाबाहेर पळून गेले असून, त्यामुळे अफगाण सैनिक आणि पोलिसांनीही आपली शस्त्रे टाकून दिली आहेत. ते तालिबानींना शरण जात आहेत. तालिबानच्या जुलमी राजवटीची दहशत अफगाणी जनतेच्या मनात असल्याने मिळेल त्या मार्गाने देशाबाहेर पडण्यासाठी त्यांची पळापळ सुरू आहे. व्हिसा, पासपोर्ट नसूनही ते  विमानतळाच्या दिशेने पळत आहेत. याच दरम्यान आम्हीच तालिबानला मदत केल्याची कबुली पाकिस्तानच्या एका मंत्र्याने दिली आहे. 

पाकिस्तानच्या इमरान खान सरकारमध्ये मंत्री असलेल्या शेख राशिद यांनी आता सर्वांसमोर जाहीरपणे तालिबानचं समर्थन केलं आहे. आम्ही तालिबानचे संरक्षक असून सर्वकाही केल्याचं म्हटलं आहे. "आम्ही बराच काळ तालिबानी नेत्यांना संरक्षण दिलेलं आहे. आमच्याकडे ते शरणार्थी म्हणून आले होते. त्यांनी इथेच शिक्षण घेतलं आणि इथेच आपलं घर वसवलं. आम्ही तालिबानसाठी सर्वकाही केलं" असल्याचं देखील शेख राशिद यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानकडून सातत्याने तालिबान्यांच्या समर्थनार्थ आणि त्यांचं कौतुक करणारी विधाने केली जात आहेत. 

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनीही माहिती दिली होती की तालिबान काही दिवसातच देशात आपलं सरकार स्थापन करतील. त्यानंतर काही काळातच तालिबाननेही याची पुष्टी केली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी आधीही तालिबानच्या समर्थनार्थ अनेकदा विधानं केली होती. नेतेच नाही तर पाकिस्तानच्या खेळाडूंनीही तालिबान्यांचं समर्थन केलं आहे. माजी क्रिकेटपटू शाहिद अफ्रिदीने  तालिबान यावेळी सकारात्मक दृष्टिकोन घेऊन आला आहे. ते महिलांना काम करण्याची परवानगी देत आहेत आणि क्रिकेटचंही समर्थन करत आहेत असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"तालिबान्यांनी दिली भयंकर शिक्षा, मृतदेह हेलिकॉप्टरला लटकवला?"; 'त्या' Video मागचं नेमकं 'सत्य'

अमेरिकेला मदत केल्याच्या रागातून तालिबान्यांची एका व्यक्तीला हेलिकॉप्टरमधून फासावर लटकवले. कंदहार परिसरात घिरट्या घालत असलेल्या हेलिकॉप्टरचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तालिबान्यांनी हेलिकॉप्टरला मृतदेह लटकल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर अमेरिकन सैन्याच्या (American Forces) वापसीनंतर विमानतळावर एक हेलिकॉप्टर उडत होतं. याला एक व्यक्ती लटकलेला होता. अमेरिकी सैन्याची मदत केल्याप्रकरणी या व्यक्तीला तालिबाननं शिक्षा दिली आहे आणि सैन्य वापसीनंतर तालिबानने आपला खरा रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे असा दावा केला आहे. मात्र आता अफगाणिस्तानच्या पत्रकारांनी या व्हायरल व्हिडिओबाबतचं वेगळंच सत्य समोर आणलं आहे.

ज्या हेलिकॉप्टरला व्यक्ती लटकला होता ते अमेरिकी हेलिकॉप्टर हॉक होतं. सोशल मीडियावर तालिबानी शिक्षेचा दावा केला जात असतानाच स्थानिक पत्रकारांनी या व्हिडिओमागचं सत्य सांगितल्याने सर्वच जण हैराण झाले. जो व्यक्ती हेलिकॉप्टरला लटकला आहे, तो तब्बल 100 मीटर उंच झेंडा फडकवण्याचं काम करत होता. म्हणजेच त्याला कोणतीही शिक्षा दिली जात नव्हती. हेलिकॉप्टरला लटकलेला व्यक्ती एक तालिबानीच आहे, जो झेंडा लावण्यासाठी लटकलेला होता. हेलिकॉप्टरच्या मदतीने तो हे काम करत होता. मात्र, यात तो यशस्वी झाला नाही.

 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानPakistanपाकिस्तान