शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

हिंदूंचा अपमान भोवला; पाकिस्तानी मंत्र्यावर राजीनामा देण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 7:20 PM

सोशल मीडिया, स्वपक्षातून टीकेची झोड उठल्यानंतर मंत्र्याचा राजीनामा

इस्लामाबाद: हिंदूंबद्दल केलेलं अपमानास्पद विधान पाकिस्तानच्या मंत्र्याला महागात पडलं आहे. आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल पंजाब प्रांताचे सांस्कृतिक मंत्री फय्याजुल हसन चौहान यांना राजीनामा द्यावा लागला. चौहान यांच्या विधानाचे पाकिस्तानात तीव्र पडसाद उमटले होते. त्यांच्यावर जनतेतून आणि पक्षातून जोरदार टीका झाली होती. चौहान यांनी एका पत्रकार परिषदेत हिंदूंचा अपमान करणारी विधानं केली. हिंदू समाज गायीचं मूत्र पितो, असं चौहान म्हणाले होते. यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. पाकिस्तानात ट्विटरवर #SackFayazChohan ट्रेंडिगमध्ये होता. अनेकांनी हा हॅशटॅग वापरुन चौहान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 'आपण मुस्लिम आहोत आणि आपल्याकडे ध्वज आहे. हा ध्वज मौला अली यांच्या शौर्याचा आहे. हा ध्वज हजरत उमर यांच्या ध्यैर्याचा आहे. तुम्हा हिंदूंकडे असा ध्वज नाही. हा ध्वज तुमच्या हातात नाही,' असं वादग्रस्त विधान फय्याजुल चौहान यांनी केलं होतं. 'तुम्ही आमच्यापेक्षा सातपट जास्त चांगले आहात, या भ्रमात राहू नका. मूर्तीची पूजा करणाऱ्यांनो, जे आमच्याकडे आहे, ते तुमच्याकडे नाही,' असं चौहान म्हणाले होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. चौहान यांनी त्यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल माफी मागितली होती. माझं विधान पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांबद्दल नव्हतं, तर ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात होतं, अशी सारवासारव त्यांनी केली.  

टॅग्स :HinduहिंदूPakistanपाकिस्तानministerमंत्रीResignationराजीनामाImran Khanइम्रान खान