Pakistan Lockdown: इराण, अमेरिका आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या तेल आणि गॅस संकटाचा मोठा फटका पाकिस्तानला बसला आहे. आता या संकटाचा सामना करण्यासाठी पाकिस्तान सरकारने ‘स्मार्ट लॉकडाउन’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा लॉकडाउन पुढील आदेशापर्यंत लागू राहणार असून, 4-5 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
शनिवार रात्रीपासून रविवारीपर्यंत बंद
स्मार्ट लॉकडाउन अंतर्गत पाकिस्तानमध्ये शनिवार मध्यरात्री 12.01 पासून रविवारी रात्री 11.59 पर्यंत अनेक निर्बंध लागू राहणार आहेत. या काळात सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच मोटरवे आणि हायवेवर वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. या निर्णयामुळे ज्या लोकांचे लग्न ठरले होते, तेही पार पडू शकणार नाहीत.
तेल आणि गॅस संकटामुळे निर्णय
इराण युद्धानंतर जगभरात तेल संकट निर्माण झाले असून, त्याचा पाकिस्तानवर मोठा परिणाम झाला आहे. आधीच महागाई आणि आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला या ऊर्जा संकटामुळे मोठा धक्का बसला आहे. एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली असून याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चावर होत आहे.
एलपीजी सिलेंडर दरात मोठी वाढ
पाकिस्तानमध्ये 11.67 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 3900 रुपयांवरून वाढून 5135 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यापूर्वी ही किंमत 3150 ते 3950 रुपयांच्या दरम्यान होती. एलपीजीवर चालणारे रिक्षा, बस आणि मिनीबस यांच्या भाड्यातही वाढ झाली आहे, त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या निम्न व मध्यमवर्गीय नागरिकांवर आर्थिक ताण वाढला आहे.
Web Summary : Pakistan faces an energy crisis due to global conflicts, prompting a 'smart lockdown'. Shops close weekends, highways shut, and weddings are banned. LPG prices surge, impacting citizens already struggling with inflation.
Web Summary : वैश्विक संघर्षों के कारण पाकिस्तान ऊर्जा संकट का सामना कर रहा है, जिससे 'स्मार्ट लॉकडाउन' लगाया गया है। सप्ताहांत में दुकानें बंद, राजमार्ग बंद, और शादियों पर प्रतिबंध है। एलपीजी की कीमतें बढ़ीं, जिससे मुद्रास्फीति से जूझ रहे नागरिकों पर असर पड़ा।