शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला; सगळाच खेळ उलटा पडला, आपलेच लोक मारले? नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 12:22 IST

या हल्ल्याचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे अफगाणिस्तानने म्हटले आहे...

पाकिस्ताननेअफगाणिस्तानात हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात 15 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा दावा तालिबानकडून केला जात आहे. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने बरमल, पक्तिकावर रात्रीच्या सुमारास पाकिस्तानने केलेल्या एअर स्ट्राइकवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या हल्ल्याचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे अफगाणिस्तानने म्हटले आहे.  

खरे तर यावेळी संबंधित मंत्रालयाने आपली भूमी आणि सार्वभौमत्वाच्या संरक्षणावर भर दिला आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, "पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात वझिरीस्तानच्या निर्वासितांना लक्ष्य करण्यात आले. हे लोक निर्वासित म्हणून पाकिस्तानातून अफगाणिस्तानात आले आहेत. या हल्ल्यातील मृतांमध्ये अनेक लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे." अशा परिस्थितीत, पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हल्ला करून आपलेच लोक मारले का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

या हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अद्याप कसलीही पुष्टी केलेली नाही. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानी सेन्याच्या जवळच्या सूत्रांचे म्हणणे आहेकी, या एअर स्ट्राइकच्या माध्यमाने सीमावर्ती भागातील तालिबानच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तानी तालिबानने पाकिस्तानी संरक्षणदलांवरील आक्रमण अधिक वाढवले आहे. तसेच, अफगान तालिबान पाकिस्तानी दहशतवाद्यांचे हल्ले रोखण्यासाठी आपल्याला सहकार्य करत नाही, असा दावा पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला आहे.  तालिबानी संरक्षण मंत्रालयाने फेटाळून लावले पाकिस्तानचे दावे -तालिबान संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते  इनायतुल्लाह ख्वारजमी यांनी पाकिस्तानी संरक्षण सूंत्रांकडून करण्यात आलेले सर्व दावे फेटाळून लावले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट शेअर करत, ख्वारजमी म्हणाले, "या हवाई हल्ल्यात सर्वसामान्य नागरिक मारले गेले आहेत. यात प्रामुख्याने वझिरिस्तानी शरणार्थ्यांचा समावेश आहे."

ख्वारेझमी म्हणाले, "या हल्ल्यात अनेक मुले, महिला आदी नागरिक मारले गेले आहेत, तसेच जखमी झाले आहेत. मात्र, मृतांचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही. आतापर्यंत महिला आणि लहान मुलांसह 15 मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तानDeathमृत्यूterroristदहशतवादी