शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

पाकिस्तानची अर्थव्यवस्था गाळात; बेसुमार महागाईनं जनतेची वाट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 6:01 PM

महागाई दर तब्बल 9.4 टक्क्यांवर पोहोचल्यानं होरपळ

इस्लामाबाद: आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या पाकिस्तानच्या अडचणी वाढतच आहेत. पाकिस्तान सरकारची तिजोरी रिकामी झाली आहे. दैनंदिन खर्चासाठी सरकारकडे पैसा शिल्लक नाही. यामुळे पाकिस्तानसमोरचं आर्थिक संकट अधिक गहिरं होत असताना जनतेच्या समस्या आणखी वाढल्या आहेत. पाकिस्तानातील महागाई दरानं गेल्या पाच वर्षांतील विक्रम मोडीत काढला आहे. मार्च महिन्यात पाकिस्तानातील महागाई दर 9.4 टक्क्यांवर डाऊन पोहोचला. वाढती महागाई, घसरता रुपया आणि तेलाच्या वाढत्या किमती यामुळे पाकिस्तान मेटाकुटीला आला आहे. पाकिस्तानच्या केंद्रीय बँकेनं व्याज दरात वाढ करत तो 10.75 टक्क्यांवर नेला आहे. पाकिस्तानच्या सांख्यिकी विभागानं (पीबीएस) दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2019 मध्ये महागाई दर 9.4 टक्क्यांवर गेला. या काळात जगभरात खनिज तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई वाढल्याचं पीबीएसनं म्हटलं. पाकिस्तानच्या डॉन वर्तमानपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या तीन महिन्यात देशातील ताज्या भाज्या, फळं आणि मांसाच्या किमतीत सतत वाढ होत आहे. जुलै ते मार्च या कालावधीत महागाई दरात 6.97 टक्क्यांनी वाढ झाली. सरकारनं गेल्या वर्षी महागाई दर 9 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचं लक्ष्य निश्चित केलं होतं. मात्र गेल्या काही महिन्यांपासून महागाईत सातत्यानं वाढ सुरू आहे. 2017-18 मध्ये पाकिस्तानातील महागाईचा दर 3.92 टक्के होता. तर 2016-17 मध्ये पाकिस्तानमधील महागाई दर 4.16 टक्के होता. रुपयाच्या मूल्ल्यात होत असलेली सातत्यपूर्ण घसरण आणि खनिज तेलाच्या दरात होत असलेली वाढ यामुळे पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेनं व्याज दरात वाढ केली. स्टेट बँक ऑफ पाकिस्ताननं व्याज दरात अर्धा टक्क्यानं वाढ केली. त्यामुळे व्याज दर 10.75 टक्क्यांवर जाऊन पोहोचला. हा गेल्या सहा महिन्यातील उच्चांक आहे. 

टॅग्स :InflationमहागाईPakistanपाकिस्तान