निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 13:10 IST2025-04-30T12:45:53+5:302025-04-30T13:10:33+5:30
पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवादी संघटनेचे नाव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) ठरावातून काढून टाकल्याचे पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी पाकिस्तानी संसदेत कबूल केले आहे.

निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता एनआयएने तपास सुरू केला आहे. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने घेतली होती. दरम्यान, पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी पाकिस्तानी संसदेत पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवादी संघटनेचे नाव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावातून काढून टाकल्याचे कबूल केले आहे.
टीआरएफ ही लष्कर-ए-तैयबाशी संबंधीत एक दहशतवादी संघटना आहे. टीआरएफने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पहलगाम हल्ल्यासाठी भारताने टीआरएफवर आरोप केला नव्हता, तर सर्वात आधी टीआरएफने स्वतः हल्ल्याची जबाबदारी घेतली.
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
पाकिस्तानने UNSC ने पाठवलेल्या प्रस्तावातून TRF चे नाव काढून टाकले आहे. पाकिस्तान सध्या UNSC च्या 10 सदस्यांमध्ये समाविष्ट आहे.
संसदेत बोलताना इशाक दार म्हणाले की, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित निषेधाचा ठराव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून आला होता आणि त्यात फक्त पहलगामचा उल्लेख होता, जम्मू आणि काश्मीरचा नाही. यावर पाकिस्तानकडून आक्षेप घेण्यात आला.
"या प्रस्तावात हल्ल्यासाठी टीआरएफला जबाबदार धरण्यात आले होते. हा प्रस्ताव पाकिस्तानला मान्य नव्हता आणि आम्ही बदल न करता प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला, असंही इशाक दार म्हणाले.
'प्रस्तावात बदल केले'
इशाक दार म्हणाले की, आम्ही संयुक्त राष्ट्रांमधील आमच्या स्थायी प्रतिनिधीला या ठरावाला विरोध करण्यास आणि पहलगामसोबत जम्मू आणि काश्मीरचे नाव लिहिण्यास सांगितले आणि ठरावातून टीआरएफचे नावही काढून टाकण्यास सांगितले.
यानंतर त्यांना अनेक देशांकडून प्रस्ताव का बदलत आहेत असे विचारत होते, पण पाकिस्तान ठाम राहिला आणि त्यांनी प्रस्ताव बदलून टाकला, असा दावाही इशाक दार यांनी केला.