पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 17:23 IST2025-05-14T17:22:50+5:302025-05-14T17:23:15+5:30

Pakistan IMF Fund: भीकेला लागलेल्या पाकला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज मिळाले आहे.

Pakistan gets financial assistance again; IMF gives ₹8400 crore amid tension with India | पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

Pakistan IMF Fund: भारत पाकिस्तान तणावादरम्यान भीकेला लागलेल्या पाकला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून(आयएमएफ) कर्ज मिळाले आहे. गेल्या आठवड्यातच आयएमएफने पाकिस्तानला 1 अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले होते. आता पाकिस्तानला 1.02 अब्ज डॉलर्स (सुमारे 8,400 कोटी रुपये) चा दुसरा हप्ता देण्यात आला आहे.

भारताने केला  निषेध 
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने म्हटले आहे की, 16 मे रोजी संपणाऱ्या आठवड्यासाठी ही रक्कम देशाच्या परकीय चलन साठ्यात समाविष्ट केली जाईल. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात आयएमएफच्या बैठकीत पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या निधीवरील मतदानापासून दूर राहून भारताने याचा निषेध केला होता.

संयुक्त राष्ट्रांप्रमाणेच कोणत्याही देशाला 'नाही' असे मत देण्याचा अधिकार आहे, पण आयएमएफमध्ये असे नाही. इथे तुम्हाला एकतर बाजूने मतदान करावे लागेल किंवा मतदानापासून स्वतःला दूर ठेवावे लागेल. यावर चिंता व्यक्त करताना भारताने म्हटले होते की, पाकिस्तान या पैशाचा वापर सीमापार दहशतवादाला चालना देण्यासाठी करू शकतो. 

पाकिस्तान भिकेला लागला
पाकिस्तान सध्या आर्थिक संकटातून जात आहे. देशाच्या परकीय चलन साठ्यात सातत्याने घट होत आहे. शिवाय, येथे महागाईही गगनाला भिडत आहे. आयएमएफकडून मिळणारा निधी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला आधार देईल, परंतु दरम्यानच्या काळात भारतासोबतच्या युद्धात पाकिस्तानचे खूप नुकसान झाले आहे. एका अहवालानुसार, या समस्यांना तोंड देणाऱ्या पाकिस्तानवर डिसेंबर 2024 पर्यंत सुमारे 131.16 अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे.

Web Title: Pakistan gets financial assistance again; IMF gives ₹8400 crore amid tension with India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.