पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 17:31 IST2025-04-26T17:28:04+5:302025-04-26T17:31:12+5:30

भारताला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. अमेरिका, फ्रान्स, इस्रायल किंवा ब्रिटन असो, सर्वांनी एकमताने या हल्ल्यावर टीका केली आहे.

Pakistan fears drone attack! Soldiers instructed to turn off phones | पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश

पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश

मंगळवारी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. दरम्यान, आता भारताने पाकिस्तानविरोधात कारवाई केली आहे. दोन्ही देशातील संबंध बिघडले आहेत. दहशतवाद्यांना सोडले जाणार नाही, असं भारत सरकारने म्हटले आहे. यामुळे आता पाकिस्तानने सैन्याला अलर्ट केले आहे. विरोधी पक्षानेही सरकारला पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती आहे, यामुळे सैन्याला पाकिस्तानने फोन न वापरण्याचे निर्देश दिले आहेत. 

लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना

भारताला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. अमेरिका, फ्रान्स, इस्रायल किंवा ब्रिटन असो, सर्वांनी एकमताने या हल्ल्यावर टीका केली आहे. तुलसी गॅबार्ड यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत इस्लामिक दहशतवादी हल्ला म्हटले. भारत काही मोठे पाऊल उचलणार असल्याचा दावा रशियाने केला आहे.

पाकिस्तानमध्येही भीतीचे वातावरण आहे, तिथल्या नेत्यांची दहशतही स्पष्टपणे दिसून येते.

पाकिस्तान एलओसीवर शस्त्रास्त्रे जमवू लागला

पहलगाम हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानचे पाणी बंद केले आहे. यामुळे पाकिस्तानने ही युद्धाचीच घोषणा असल्याचा दावा करत अधिकारासाठी लढणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच एलओसी मानणारा शिमला करारही निलंबित केला आहे. या हल्ल्याचा भारत बदला घेणार अशी भीती पाकिस्तानला सतावत आहे. यामुळे पाकिस्तानने रणगाडे, मिसाईल आदी शस्त्रास्त्रे सीमेवर पाठविण्यास सुरुवात केली आहे. एकप्रकारे पाकिस्तान युद्धाची तयारी करू लागला आहे. 

पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी

 पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेत सिंधु जल कराराला स्थगिती दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा थयथयाट झाल्याचं दिसून येते. भारताचे आरोप नाकारत पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पहलगाम हल्ल्याच्या चौकशीची मागणी केली. त्याशिवाय आम्ही कुठल्याही परिस्थितीला सामोरे जायला तयार आहे असं सांगत भारताला पोकळ धमकीही दिली आहे. 

शहबाज शरीफ म्हणाले की, भारताने आरोप-प्रत्यारोपाचा खेळ बंद करावा. भारताच्या कुठल्याही हल्ल्याला आम्ही ताकदीने उत्तर देऊ. पाकिस्तानला शांतता हवी परंतु आम्ही शांत आहोत म्हणजे कमकुवत समजू नका. जर भारताने सिंधु नदीचं पाणी थांबवण्याचा प्रयत्न केला तर आम्हीही त्याला ताकदीने प्रत्युत्तर देऊ. पहलगाम हल्ल्याच्या तटस्थ चौकशीला आम्ही तयार आहोत. परिस्थिती काहीही असली तरी आम्ही सन्मानाशी तडजोड करणार नाही असं त्यांनी म्हटलं. पाकिस्तानी सैन्य प्रमुखासमोर त्यांनी हे विधान केले.

Web Title: Pakistan fears drone attack! Soldiers instructed to turn off phones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.