Pakistan Election Results: भारतासोबतचे संबंध सुधारण्यावर भर देणार, विजयानंतर इम्रान खानची प्रतिक्रिया  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 06:57 PM2018-07-26T18:57:19+5:302018-07-26T19:40:12+5:30

निवडणूक प्रचारादररम्यान भारताविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या इम्रान खान यांनी निवडणूक जिंकल्यानंतर आपली भूमिका मवाळ केली आहे.

Pakistan Election Results: Imran Khan News | Pakistan Election Results: भारतासोबतचे संबंध सुधारण्यावर भर देणार, विजयानंतर इम्रान खानची प्रतिक्रिया  

Pakistan Election Results: भारतासोबतचे संबंध सुधारण्यावर भर देणार, विजयानंतर इम्रान खानची प्रतिक्रिया  

Next

इस्लामाबाद - निवडणूक प्रचारादररम्यान भारताविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या इम्रान खान यांनी निवडणूक जिंकल्यानंतर आपली भूमिका मवाळ केली आहे. उपखंडामध्ये समृद्धीसाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये दोस्ती होणे आवश्यक असल्याचे सांगत भारतासोबतचे संबंध सुधारण्याची इच्छा असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे. 

पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर संवाद साधताना इम्रान खान म्हणाले. जर आम्हाला या क्षेत्रातून गरिबी दूर करायची असेल, तर आम्हाला भारत आणि पाकिस्तामधील व्यापार वाढवला पाहिजे." यावेळी कायदे आझम मोहम्मद अली जिन्ना यांच्या स्वप्नातील पाकिस्तान आपल्याला बनवायचा आहे, असेही इम्रान यांनी सांगितले. 




यावेळी इतर पाकिस्तानी नेत्यांप्रमाणेच इम्रान यांनीही काश्मीर राग आळवला. "भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीर हा सर्वात मोठा मुद्दा आहे. गेली 30 वर्षे काश्मिरी जनतेने बरेच काही सहन केले आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानने हा मुद्दा चर्चेच्या माध्यमातून सोडवला पाहिजे. यावेळी बलुचिस्तानमध्ये जे काही होत आहे, त्यामागे भारताचा हात असल्याचे आम्हाला वाटते, असा आरोपही त्याने केला. मात्र या आरोप-प्रत्यारोपांना मागे टाकून आपण पुढे गेले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. तसेच भारताने एक पाऊल पुढे टाकल्यास आम्ही दोन पावले पुढे येऊ असेही ते म्हणाले.  





 दरम्यान, भारतीय प्रसारमाध्यमांनी आपल्याविषयी केलेल्या नकारात्मक प्रचाराबाबत इम्रान खान यांनी निराशा व्यक्त केली. भारतातील मीडियाने मला बॉलिवू़डमधील व्हिलनप्रमाणे दाखवले.  मात्र मी असा पाकिस्तानी आहे. जो क्रिकेटमुळे संपूर्ण भारत फिरलो आहे.  



 

Web Title: Pakistan Election Results: Imran Khan News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.