भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानचे हौसले पस्त! लष्कराकडून चर्चेचे निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 15:17 IST2019-02-27T15:16:54+5:302019-02-27T15:17:18+5:30
भारतीय हवाई दलाने मंगळवारी केलेल्या एअरस्ट्राइकमुळे पाकिस्तानमध्ये जबरदस्त तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, एअर स्ट्राइकनंतर भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानचे हौसले पस्त झाल्याचे वृत्त आहे.

भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानचे हौसले पस्त! लष्कराकडून चर्चेचे निमंत्रण
इस्लामाबाद - भारतीय हवाई दलाने मंगळवारी केलेल्या एअरस्ट्राइकमुळे पाकिस्तानमध्ये जबरदस्त तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, एअर स्ट्राइकनंतर भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानचे हौसले पस्त झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, भारताच्या कारवाईमुळे भेदरलेल्या पाकिस्तानी लष्कराने भारताला चर्चेचे निमंत्रण दिल्याचे वृत्त आहे.
युद्ध हे कुठल्याही प्रश्नाचे उत्तर ठरू शकत नाही. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाल्यास कुणीच विजयी होणार नाही. त्यामुळे प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवावेत, असा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. दरम्यान, पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मंगळवारी भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.