नेतन्याहूंच्या एका धमकीपुढे झुकला पाकिस्तान; संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना डिलीट करावी लागली 'ती' वादग्रस्त पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 11:39 IST2026-04-10T11:34:57+5:302026-04-10T11:39:21+5:30

इजरायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या कडक तंबीनंतर, आसिफ यांच्यावर त्यांच्या एक्स (X) हँडलवरून इजरायलविरोधी पोस्ट हटवणे भाग पडले आहे. ..

Pakistan bows to Netanyahu's threat Defense Minister Khawaja Asif had to delete that controversial post | नेतन्याहूंच्या एका धमकीपुढे झुकला पाकिस्तान; संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना डिलीट करावी लागली 'ती' वादग्रस्त पोस्ट

नेतन्याहूंच्या एका धमकीपुढे झुकला पाकिस्तान; संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना डिलीट करावी लागली 'ती' वादग्रस्त पोस्ट

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील 'इस्लामाबाद' येते दोन्ही देशांत चर्चा होणार आहे. या चर्चेपूर्वीच, इजरायलविरोधी वादग्रस्त विधान करणे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना चांगलेच महागात पडले आहे. इजरायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या कडक तंबीनंतर, आसिफ यांच्यावर त्यांच्या एक्स (X) हँडलवरून इजरायलविरोधी पोस्ट हटवणे भाग पडले आहे. 

या घटनेकडे पाकिस्तानची कूटनीतिक शरणागती म्हणून बघितले जात आहे. संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी आपल्या एका पोस्टमध्ये इजरायलला उद्देशून 'मानवतेसाठी शाप', असा केला होता. त्यांच्या या विधानावर नेतन्याहू यांच्या कार्यालयाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेत, हे वक्तव्य 'अपमानजनक' असून अशी भाषा खपवून घेतली जाणार नाही. विशेषतः जो देश स्वतःला जागतिक मुत्सद्देगिरीत 'तटस्थ मध्यस्थ' म्हणून सादर करत आहे, अशा देशाकडून.

महत्वाचे म्हणजे, अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानत शांतता चर्चा होणार असतानाच, हा नवा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, इस्रायलने फटकारल्यानंतर ख्वाजा आसिफ यांना आपली पोस्ट तातडीने डिलीट करावी लागली. यावरून, पाकिस्तान सध्या कोणताही जागतिक दबाव सहन करण्याच्या स्थितीत दिसत नाही.

तज्ज्ञांच्या मते, या प्रकरणाने पाकिस्तान एका जबाबदार 'शांतीदूत' म्हणून जी प्रतिमा निर्माण करत आहे, तिला मोठा तडा बसला आहे. याच कारणामुळे इस्रायलच्या तीव्र आक्षेपानंतर ख्वाजा तातडीने पाऊल उचलत वादग्रस्त पोस्ट हटवून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

 

Web Title : नेतन्याहू की धमकी के आगे पाकिस्तान झुका; मंत्री ने इजरायल विरोधी पोस्ट हटाई

Web Summary : नेतन्याहू के कार्यालय से कड़ी चेतावनी के बाद पाकिस्तान के ख्वाजा आसिफ ने इजरायल विरोधी पोस्ट हटाई। अमेरिका और ईरान के बीच पाकिस्तान में शांति वार्ता के बीच इस घटना को राजनयिक समर्पण माना जा रहा है, जिससे पाकिस्तान की तटस्थ मध्यस्थ की भूमिका पर सवाल उठ रहे हैं।

Web Title : Pakistan Bows to Netanyahu's Threat; Minister Deletes Anti-Israel Post

Web Summary : Pakistan's Khwaja Asif deleted an anti-Israel post after a stern warning from Netanyahu's office. This incident, viewed as diplomatic surrender, occurred amidst peace talks between the US and Iran in Pakistan, raising questions about Pakistan's role as a neutral mediator.