पाकिस्तान पुन्हा बॉम्बस्फोटानं हादरलं, 20 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 00:12 IST2017-08-07T23:10:44+5:302017-08-08T00:12:38+5:30
पाकिस्तानातील पंजाब प्रांताची राजधानी असलेलं लाहोर शहर बॉम्बस्फोटानं हादरलं.

पाकिस्तान पुन्हा बॉम्बस्फोटानं हादरलं, 20 जण जखमी
इस्लामाबाद, दि. 7 - पाकिस्तानातील पंजाब प्रांताची राजधानी असलेलं लाहोर शहर बॉम्बस्फोटानं हादरलं. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 20 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. लाहोरमधल्या बंड रोड परिसरात हा बॉम्बस्फोट झाला आहे. बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवलं असून, आणीबाणी जाहीर केली आहे. बॉम्बस्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट असून, कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.