Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; १२ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 14:28 IST2025-11-11T14:27:41+5:302025-11-11T14:28:16+5:30
पाकिस्तानमधील इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला असून २० ते २५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; १२ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
पाकिस्तानमधील इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला असून २० ते २५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. कोर्ट परिसरातील पार्किंग एरियामध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्याने हा स्फोट झाला. स्फोटाचा मोठा आवाज दूरवर ऐकू गेला, ज्यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्ट परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी आणि गर्दी असताना हा मोठा स्फोट झाला. या स्फोटात अनेक वकील आणि नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आजूबाजूचा परिसर सील केला आहे आणि प्राथमिक तपास सुरू केला आहे.
बदला ऑन द स्पॉट
— Riniti Chatterjee (@ChatterjAsking) November 11, 2025
पाकिस्तान की राजधानी इस्लामाबाद की जिला कोर्ट में भीषण ब्लास्ट..
उड़ गए कई वकीलों के चीथड़े, कई कारें आग में स्वाहा...
अब तक 6 की मौत, 12 घायल... मृतकों की बढ़ सकती है संख्या..
धमाका देखकर वकीलों के होश उड़ गये हैं दुर से ही तमाशा देख रहे है pic.twitter.com/XpBHP45V5O
सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, हा स्फोट सिलिंडरच्या स्फोटामुळे झाला आहे. मात्र सखोल तपास सुरू आहे. घटनास्थळी सुरक्षा दल आणि फॉरेन्सिक पथके तैनात करण्यात आली आहेत, स्फोटाचं नेमकं कारण आणि इतर गोष्टींचा तपास सुरू आहे.
या घटनेनंतर कोर्ट परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सध्या सर्व न्यायालयीन कामकाज स्थगित करण्यात आलं आहे आणि पोलिसांनी जनतेला सावधगिरी बाळगण्याचं आवाहन देखील केलं आहे.