शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! वरळी डोमच्या बाहेर तुफान गर्दी, अनेक नेते प्रवेशद्वारावरच अडकले
2
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
3
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
4
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
5
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
6
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
7
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
8
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
9
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
10
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
11
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
12
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
13
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
14
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
15
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
16
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
17
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
18
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
20
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी

भारताप्रमाणे सवलतीच्या दरात कच्चं तेल मिळेल या आशेनं पाकनं रशियापुढे हात पसरले, पण झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 21:39 IST

Pakistan asks Russia for Cheap Crude Oil : भारत अनेक वर्षांपासून रशियाकडून स्वस्त कच्च तेल खरेदी करत आहे. पाकिस्ताननंही यासाठी रशियापुढे हात पसरले.

युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियावर कडक निर्बंध लादले होते. अशा परिस्थितीत रशियाच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला. भारताने याचा फायदा घेत रशियाकडून मोठ्या सवलतीत कच्चे तेल विकत घेतले. भारत अजूनही रशियाकडून स्वस्त किंमतीत कच्चे तेल खरेदी करत आहे. आपला शेजारी देश पाकिस्तानही रशियाकडून स्वस्त कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी गेला होता. परंतु पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे.

रशियाने पाकिस्तानला स्वस्तात कच्चे तेल देण्यास नकार दिला. द न्यूज या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ ही मागणी घेऊन रशियाला गेले होते. पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने रशियन अधिकाऱ्यांशी चर्चा करून कच्च्या तेलावर 30-40 टक्के सूट देण्याची मागणी केली होती. परंतु रशियाने ही मागणी फेटाळून लावली.

रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या शिष्टमंडळात पेट्रोलियम राज्यमंत्री मुस्सादिक मलिक, पेट्रोलियम सचिव मोहम्मद महमूद, मॉस्कोमधील पाकिस्तानच्या दूतावासातील संयुक्त सचिव आणि इतर अधिकारी यांचा समावेश होता. बुधवारी रशियन अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी ही मागणी केली होती. आता गुरुवारी रशियाने कच्च्या तेलावर सूट देण्यास नकार दिला. वृत्तानुसार, चर्चा कोणत्याही ठोस निकालाशिवाय संपली. तसंच आपल्या निर्णयाची माहिती नंतर कूटनीतिक माध्यमातून कळवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाकिस्तानात पेट्रोल-डिझेलची महागाईपाकिस्तानचे शिष्टमंडळ २९ नोव्हेंबरला मॉस्कोला रवाना झाले. कमी किमतीत कच्चे तेल मिळण्याच्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी रशियन अधिकाऱ्यांशी वाटाघाटी करणे हा या भेटीचा उद्देश होता. पाकिस्तान सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईचा सामना करत आहे. भारताप्रमाणेच रशियाकडूनही स्वस्तात कच्चे तेल मिळेल, अशी पाकिस्तानला आशा होती. पण रशियाने नकार दिला. रिपोर्टनुसार, अन्य देशांना दिल्या जात असलेल्या किंमतीतच पाकिस्तानला कच्चे तेल पुरवले जाणार असल्याचे रशियाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :russiaरशियाPakistanपाकिस्तानIndiaभारतCrude Oilखनिज तेल