पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 18:33 IST2025-05-20T18:32:55+5:302025-05-20T18:33:46+5:30

Asim Munir Promoted: भारताकडून दारुण पराभव होऊनही पाकिस्तानी सरकारने लष्करप्रमुखाची बढती केली आहे.

Pakistan Army Chief Asim Munir promoted; Shahbaz government made him Field Marshal | पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'

पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'

Asim Munir Promoted: भारताकडून पराभव पत्करल्यानंतरही पाकिस्तानमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. शाहबाज सरकार विजयाचा दावा करुन जनतेला मूर्ख बनवण्याचे काम करत आहे. अशातच सरकारने पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांना बढती दिली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये दारुण पराभव झाल्यावरही पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मुनीरला 'फील्ड मार्शल' बनवले आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारत-पाकिस्तानच्या सद्यस्थितीची माहिती दिली.

पाकिस्तानमध्ये फील्ड मार्शल हे पाकिस्तानच्या सशस्त्र दलातील सर्वोच्च पद आहे. जनरल असीम मुनीर देशाच्या इतिहासातील दुसरे फील्ड मार्शल बनले आहेत. यापूर्वी अयुब खान यांनी 1959 ते 1967 दरम्यान हे पद भूषवले होते. असीम मुनीर हे 2022 पासून पाकिस्तानचे 11 वे लष्करप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांचा लष्करप्रमुख म्हणून कार्यकाळ तीनवरुन पाच वर्षांपर्यंत वाढवण्यात आला होता. त्यापूर्वी ते आयएसआय प्रमुख होते.

पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना

दरम्यान, फील्ड मार्शल बनल्यानंतर असीम मुनीर यांना आता पाकिस्तानच्या सैन्य आणि गुप्तचर संस्थांमधील समन्वय मजबूत करण्याचे काम करावे लागेल. यामुळे भारताविरुद्ध हायब्रिड वॉर टेररिझम, सायबर हल्ले आणि प्रॉक्सी वॉरफेअरसारख्या कारवाया आणखी तीव्र होऊ शकतात.

Web Title: Pakistan Army Chief Asim Munir promoted; Shahbaz government made him Field Marshal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.