पाकिस्तानात बॉम्बस्फोटाची मालिका! आत्मघाती बॉम्बस्फोटात ९ पोलीस ठार, ११ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 15:25 IST2023-03-06T14:13:37+5:302023-03-06T15:25:42+5:30
दक्षिण-पश्चिम पाकिस्तानमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात ९ पोलीस कर्मचारी ठार झाले आहेत.

पाकिस्तानात बॉम्बस्फोटाची मालिका! आत्मघाती बॉम्बस्फोटात ९ पोलीस ठार, ११ जखमी
दक्षिण-पश्चिम पाकिस्तानमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात ९ पोलीस कर्मचारी ठार झाले आहेत, तर ११ जण जखमी झाले. सोमवारी एका दुचाकीस्वार आत्मघाती बॉम्बरने पोलिसांच्या वाहनाला धडक दिल्याने हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटापासून १६० किलोमीटर पूर्वेला असलेल्या सिब्बी शहरात हा हल्ला झाला. आत्मघाती हल्लेखोर मोटरसायकलवर होता आणि त्याने ट्रकला मागून धडक दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बॉम्बशोधक पथक आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. अजुनही या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही, असे सांगितले.