पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध

By विराज भागवत | Updated: May 3, 2025 18:08 IST2025-05-03T18:08:17+5:302025-05-03T18:08:48+5:30

Gulf Countries condemned Pahalgam Terrorist Attack: मराठी अनिवासी भारतीय संघटनांनी ‘डिजिटल एकत्रीकरण बैठक’ घेत मांडली भूमिका

Pahalgam terror attack strongly condemned by various marathi speaking NRI groups in Gulf countries | पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध

Gulf Countries condemned Pahalgam Terrorist Attack: काही दिवसांपूर्वी काश्मीरमधील पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ निष्पाप हिंदू पर्यटक मारले गेले. या हल्ल्याबाबत जगभरातून निषेध व्यक्त करण्यात आहे. आखाती देशांतूनही या हल्ल्याबाबत संतापाची लाट दिसून आली. अनिवासी मराठी भारतीयांनी एकत्र येऊन या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष डिजिटल बैठक घेण्यात आली. या बैठकीत मध्यपूर्व, उत्तर आफ्रिका, युरोप, दक्षिण आफ्रिका आणि यूके येथील मराठी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. महाराष्ट्र कल्चरल सोसायटी, दुबईचे अध्यक्ष अभिजीत इगावे यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली.

पहलगाम हल्ल्याविषयी सामूहिक मतप्रदर्शन

या बैठकीत सहभागी झालेल्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, आखाती देशांमध्ये भारतीयांसोबत पाकिस्तानी नागरिकही मोठ्या प्रमाणात वास्तव्य करतात. गेल्या अनेक दशकांत भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धांनंतर किंवा अतिरेकी हल्ल्यांनंतरही इथले वातावरण कधीही तणावपूर्ण झाले नाही. या घटनेनंतर नातेसंबंधांमध्ये क्षुल्लक का होईना पण तणाव निर्माण झाला. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर आखाती देशांतील स्थानिक मुस्लीम नागरिकांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला. पर्यटकांवर केलेला हल्ला अत्यंत निषेधार्ह असून अशा कृत्यांना कोणताही आधार नसल्याचे मत अनेकांनी मांडले.

या बैठकीत विविध देशांतील मराठी संघटनांचे प्रमुख, प्रतिनिधी, व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर एकजूट होऊन या भ्याड हल्ल्याचा निषेध करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

महाराष्ट्र सदन उभारण्याच्या मागणीला जोर

या बैठकीत ‘महाराष्ट्र सदन’ प्रकल्पाच्या स्थापनेसंदर्भातही सविस्तर चर्चा झाली. दुबई, बँकॉक (थायलंड) आणि लंडन (UK) येथे स्थायिक मराठी समाजासाठी कायमस्वरूपी सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक केंद्र उभारण्यासाठी सर्व संघटना एकत्र आल्या. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर शरद पवार यांना महाराष्ट्र सदन उभारणीबाबत आराखडा विविध संघटनांनी सादर केला आहे. प्रत्येक देशातील महाराष्ट्र सदन उभारण्याचा अंदाजे खर्च हा २७५ ते ३०० कोटी रुपये एवढा आहे. एक सुसज्ज इमारत उभी राहतानाच महाराष्ट्रातून जगाच्या पाठीवर वरील देशात गेल्यानंतर प्रत्येकाला सर्व प्रकारच्या सोई सुविधा उपलब्ध करून देणे हा यामागील उद्देश आहे. हे केंद्र केवळ स्थानिक मराठी समाजासाठी नव्हे, तर जगभरातून येणाऱ्या मराठी पर्यटक आणि अभ्यासकांसाठीही खुले असेल.

“मराठी संस्कृतीचे जतन व जागतिक स्तरावर प्रभावी विस्तार करणे, मराठी तरुणांना परदेशातील संधी उपलब्ध करून देणे, अनिवासी मराठी बांधवांच्या समस्यांची योग्यरित्या मांडणी करणे, प्रशासन, शासकीय संस्था आणि व्यावसायिक समाज यांच्यात समन्वय साधून शाश्वत उपाययोजना कार्यान्वित करणे हाच आमचा सामूहिक दृष्टिकोन आहे," असे अभिजीत इगावे यांनी सांगितले.

बैठकीत कोण-कोण उपस्थित?

अभिजित देशमुख – छत्रपती मराठा साम्राज्य अध्यक्ष, नागेंद्र बेलुरे – महाराष्ट्र मंडळ अध्यक्ष, सौदी अरेबिया (जुबैल); राधिका साडेकर, अध्यक्ष महाराष्ट्र मंडळ, कुवेत, राघव साडेकर – गर्जे मराठी अध्यक्ष, कुवैत; अनुप वेल्हाळ – महाराष्ट्र मंडळ अध्यक्ष, बहरैन; मेघना हसमनीस – महाराष्ट्र मंडळ अध्यक्ष, बँकॉक, थायलंड;, दुबई; महेश धोमकर – महाराष्ट्र मंडळ अध्यक्ष, दुबई; उषा पाटील – महाराष्ट्र मंडळ अध्यक्ष, कतार; विक्रम भोसले, छत्रपती मराठा साम्राज्य उपाध्यक्ष, दुबई;सुनील मांजरेकर – अध्यक्ष GMBF दुबई; संतोष कारंडे, अध्यक्ष आमी परिवार, अमेरिका, मुकुंदराज पाटील – सत्यशोधक दुबई; संदीप कड – दुबई मराठी मंडळ; संदीप कर्णिक – माजी अध्यक्ष, महाराष्ट्र मंडळ, मस्कत, ओमान; राजेश पाटील – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचारमंच, दुबई; सुनीता देशमुख – अध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड,अभिजित सामंत – महाराष्ट्र मंडळ, सायप्रस; शिवाजी काका नारुने – अध्यक्ष, शिवाजी काका ग्रुप, दुबईशांती पिसे – CMS, यूके (लंडन); स्नेहल कुलते – AAMI परिवार, यूएई; श्रीधर सावंत – महाराष्ट्र मंडळ अध्यक्ष, अबुधाबी; दुबई; सुरेश वाघमारे – माजी अध्यक्ष, महाराष्ट्र मंडळ, कुवैत;...
अभिजित देशमुख – छत्रपती मराठा साम्राज्य अध्यक्ष, नागेंद्र बेलुरे – महाराष्ट्र मंडळ अध्यक्ष, सौदी अरेबिया (जुबैल); राधिका साडेकर, अध्यक्ष महाराष्ट्र मंडळ, कुवेत, राघव साडेकर – गर्जे मराठी अध्यक्ष, कुवैत; अनुप वेल्हाळ – महाराष्ट्र मंडळ अध्यक्ष, बहरैन; मेघना हसमनीस – महाराष्ट्र मंडळ अध्यक्ष, बँकॉक, थायलंड;, दुबई; महेश धोमकर – महाराष्ट्र मंडळ अध्यक्ष, दुबई; उषा पाटील – महाराष्ट्र मंडळ अध्यक्ष, कतार; विक्रम भोसले, छत्रपती मराठा साम्राज्य उपाध्यक्ष, दुबई;सुनील मांजरेकर – अध्यक्ष GMBF दुबई; संतोष कारंडे, अध्यक्ष आमी परिवार, अमेरिका, मुकुंदराज पाटील – सत्यशोधक दुबई; संदीप कड – दुबई मराठी मंडळ; संदीप कर्णिक – माजी अध्यक्ष, महाराष्ट्र मंडळ, मस्कत, ओमान; राजेश पाटील – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचारमंच, दुबई; सुनीता देशमुख – अध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड,अभिजित सामंत – महाराष्ट्र मंडळ, सायप्रस; शिवाजी काका नारुने – अध्यक्ष, शिवाजी काका ग्रुप, दुबईशांती पिसे – CMS, यूके (लंडन); स्नेहल कुलते – AAMI परिवार, यूएई; श्रीधर सावंत – महाराष्ट्र मंडळ अध्यक्ष, अबुधाबी; दुबई; सुरेश वाघमारे – माजी अध्यक्ष, महाराष्ट्र मंडळ, कुवैत.

Web Title: Pahalgam terror attack strongly condemned by various marathi speaking NRI groups in Gulf countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.