शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दुखवायचे नसल्याने त्यांच्याशी युती केली; CM फडणवीसांनी सांगितली Inside Story
2
भाजप-काँग्रेस नगरसेवकांचा घरोबा; आधी अभद्र युती, नंतर डॅमेज कंट्रोल, अखेर कारवाई
3
“काँग्रेसचे खासदार बिनविरोध आले तेव्हा लोकशाही धोक्यात आली नाही का?”: CM देवेंद्र फडणवीस
4
अजित पवार ताणताहेत, भाजप सहन करतंय; पण का?; काका-पुतण्याच्या जोडीला मूकसंमती? 
5
देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंच्या सभांना उमेदवारांची सर्वाधिक मागणी; सभा, रोड शोंचा कल्ला सुरू
6
काही लोकांचा विकास नव्हे, तर खुर्ची हा एकच अजेंडा आहे; शिंदेंची ठाकरे बंधूंवर घणाघाती टीका
7
घडामोडींना वेग, काँग्रेसकडून कारवाईचा बडगा; आता अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक भाजपमध्ये येणार
8
विरोधी पक्षनेतेपद नाहीच, आता प्रतोदांचा मंत्रिपदाचा दर्जाही जाणार; सरकारची सदस्य संख्येची अट
9
डॉन अरुण गवळीच्या दोन्ही मुली करोडपती; प्रतिज्ञापत्रातून उमेदवारांच्या मालमत्तेची माहिती उघड
10
अधिकाऱ्यांवरील कारवाईचा चेंडू आयोगाच्या कोर्टात; ६ बिनविरोध उमेदवारांप्रकरणी अहवाल सादर
11
भारत देणार सर्वांना धक्का; वृद्धिदर ७.४ टक्के राहणार, सरकारने जाहीर केली आकडेवारी
12
शिंदेसेना उमेदवाराच्या पोटात चाकू खुपसला; वांद्रे येथे प्रचार करताना झाला जीवघेणा हल्ला
13
"आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, पण जो..."; मंत्री नितेश राणेंनी दिली उघड धमकी
14
काळजाचा थरार! ११ वर्षीय शिवमनं बिबट्याच्या हल्ल्यातून ९ वर्षीय बहीण स्वरांजलीला वाचवले
15
वेदा‍ंता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचं निधन
16
अमेरिका-रशियात तणाव वाढला! व्हेनेझुएलाहून जाणारा रशियन तेल टँकर US नौदलाने जप्त केला
17
उल्हासनगरातील गुंडाराज संपवून शहराचा चेहरामोहरा बदलणार; CM देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर?
18
मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत
19
मासेमारी करताना समुद्रात पडला खलाशी; ४ दिवसांनी मध्यरात्री 'असं' काय घडलं, कुटुंबाला बसला शॉक
20
पुण्यात 'पाताळ लोक' तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अख्खा प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 22:43 IST

...याचा अर्थ असा होतो की, पाकिस्तानच्या मित्र देशांनीही त्याला एकटे सोडले आहे आणि हे एखाद्या झटक्यापेक्षा नक्कीच कमी नाही.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तान विरुद्ध कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. यामुळे पाकिस्तानात घबराट निर्माण झाली आहे. आतापर्यंत भारताने सिंद्धू पाणी कराराच्या स्थगितीसह पाकिस्तानविरुद्ध पाच मोठ्या कारवाया केल्या आहेत. मात्र याहूनही काही मोठ्या कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे पाकिस्तान भयभीत झाल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर त्याने मदतीसाठी आपल्या मित्र देशांशीही संपर्क साधला होता. मात्र, त्याच्याकडूनही त्याला झटकाच बसला आहे. यासंदर्भात पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पहलगाम हल्ल्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी सर्व मित्र देशांशी संपर्क साधला. परंतु अद्याप कुणीही मध्यस्थीचा प्रयत्न केलेला नाही. याचा अर्थ असा होतो की, पाकिस्तानच्या मित्र देशांनीही त्याला एकटे सोडले आहे आणि हे एखाद्या झटक्यापेक्षा नक्कीच कमी नाही.

दक्षिण काश्मिरातील पहलगाममधील 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन या प्रमुख पर्यटन स्थळावर मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झला तर अनेक जण जखमी जाले आहेत. यांपैकी बहुतंश पर्यटक आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा अनेक मुस्लीम देशांनी निषेध केला आहे. कतार, जॉर्डन आणि इराक तसेच दिल्लीतील अरब लीग मिशननेही या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. तसेच, भारतासोबत एकता आणि शोककूल कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. याशिवया इतरही अनेक देशांकडून एकतेचे संदेश आले आहेत.

दरम्यान, आपल्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता शफकत अली खान म्हणाले, "सिंधू पाणी करार अगदी स्पष्ट आहे. पाकिस्तानसाठी सर्व पर्याय उपलब्ध आहेत. ही आमची जीवनरेखा आहे. आमचा हक्क आहे. आमच्या लोकांसाठी हा अधिकार सुरक्षित करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू."

तत्पूर्वी, भारतानेही नवी दिल्लीतील सुमारे ४५ देशांच्या राजदूतांना पहलगाममधील क्रूर दहशतवादी हल्ल्याची आणि त्याचा सीमापार दहशतवादाशी असलेला संबंध, यासंदर्भात माहिती देऊन पाकिस्तानवर डिप्लोमॅटिक स्ट्राइक केला होता. परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन तुकड्यांमध्ये राजदूतांना यासंदर्भात माहिती दिली. यावेळी लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि पश्चिम आशियातील राजदूत उपस्थित होते. भारताने गुरुवारी बहुतेक G20 देशांमधील वरिष्ठ राजदूतांना आणि आपल्या अनेक जवळच्या धोरणात्मक भागीदारांना दहशतवादी हल्ल्यासंदर्भात माहिती दिली. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत