भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 22:43 IST2025-04-25T22:42:09+5:302025-04-25T22:43:15+5:30
...याचा अर्थ असा होतो की, पाकिस्तानच्या मित्र देशांनीही त्याला एकटे सोडले आहे आणि हे एखाद्या झटक्यापेक्षा नक्कीच कमी नाही.

भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तान विरुद्ध कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. यामुळे पाकिस्तानात घबराट निर्माण झाली आहे. आतापर्यंत भारताने सिंद्धू पाणी कराराच्या स्थगितीसह पाकिस्तानविरुद्ध पाच मोठ्या कारवाया केल्या आहेत. मात्र याहूनही काही मोठ्या कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे पाकिस्तान भयभीत झाल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर त्याने मदतीसाठी आपल्या मित्र देशांशीही संपर्क साधला होता. मात्र, त्याच्याकडूनही त्याला झटकाच बसला आहे. यासंदर्भात पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पहलगाम हल्ल्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी सर्व मित्र देशांशी संपर्क साधला. परंतु अद्याप कुणीही मध्यस्थीचा प्रयत्न केलेला नाही. याचा अर्थ असा होतो की, पाकिस्तानच्या मित्र देशांनीही त्याला एकटे सोडले आहे आणि हे एखाद्या झटक्यापेक्षा नक्कीच कमी नाही.
दक्षिण काश्मिरातील पहलगाममधील 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन या प्रमुख पर्यटन स्थळावर मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झला तर अनेक जण जखमी जाले आहेत. यांपैकी बहुतंश पर्यटक आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा अनेक मुस्लीम देशांनी निषेध केला आहे. कतार, जॉर्डन आणि इराक तसेच दिल्लीतील अरब लीग मिशननेही या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. तसेच, भारतासोबत एकता आणि शोककूल कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. याशिवया इतरही अनेक देशांकडून एकतेचे संदेश आले आहेत.
दरम्यान, आपल्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता शफकत अली खान म्हणाले, "सिंधू पाणी करार अगदी स्पष्ट आहे. पाकिस्तानसाठी सर्व पर्याय उपलब्ध आहेत. ही आमची जीवनरेखा आहे. आमचा हक्क आहे. आमच्या लोकांसाठी हा अधिकार सुरक्षित करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू."
तत्पूर्वी, भारतानेही नवी दिल्लीतील सुमारे ४५ देशांच्या राजदूतांना पहलगाममधील क्रूर दहशतवादी हल्ल्याची आणि त्याचा सीमापार दहशतवादाशी असलेला संबंध, यासंदर्भात माहिती देऊन पाकिस्तानवर डिप्लोमॅटिक स्ट्राइक केला होता. परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन तुकड्यांमध्ये राजदूतांना यासंदर्भात माहिती दिली. यावेळी लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि पश्चिम आशियातील राजदूत उपस्थित होते. भारताने गुरुवारी बहुतेक G20 देशांमधील वरिष्ठ राजदूतांना आणि आपल्या अनेक जवळच्या धोरणात्मक भागीदारांना दहशतवादी हल्ल्यासंदर्भात माहिती दिली.