पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 08:29 IST2025-04-25T08:28:00+5:302025-04-25T08:29:21+5:30

Pahalgam terror attack: काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ता टॅमी ब्रूस यांनी काय भूमिका मांडली?

Pahalgam attack: What is America's position on Pakistan now? Ministry of External Affairs gave its response | पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं

पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं

America on Pahalgam Terror Attack: पहलगाममधील बैसरन घाटीमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही हल्ल्याच्या निषेध करत दहशतवादविरोधी लढ्यात भारतासोबत असल्याचे म्हटले. दरम्यान, पाकिस्तानबद्दल अमेरिकेची सद्या भूमिका काय आहे? असा प्रश्न अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ता टॅमी ब्रूस यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ता टॅमी ब्रूस यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांना काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेची पाकिस्तानबद्दलची भूमिका काय आहे, याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. 

वाचा >>आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती

या प्रश्नाला उत्तर देताना प्रवक्ता ब्रूस म्हणाल्या, 'अमेरिका परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहे. खूप वेगाने परिस्थिती बदलत आहेत आणि आम्ही जवळून सगळ्या घडामोडींकडे बघत आहोत.'

"राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्र मंत्री रुबियो यांनी आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. अमेरिका भारतासोबत आहे आणि प्रत्येक दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध करते", असेही त्या म्हणाल्या. 

'सध्या मी यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही'

टॅमी ब्रूस पुढे म्हणाल्या की, 'आम्ही काश्मीर आणि जम्मूतील परिस्थितीवर आताच कोणतीही अधिकृत भूमिका घेणार नाही. सध्या मी यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही.'

'या हल्ल्यात ज्यांनी प्राण गमावले आहेत, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. जखमींची प्रकृती लवकर चांगली व्हावी अशी प्रार्थना आणि आम्ही हीच भूमिका आहे की, या हल्ल्यातील जे गुन्हेगार आहेत. त्यांना लवकर न्यायाच्या कटघऱ्यांमध्ये उभं केलं जावं', असे टॅमी ब्रूस म्हणाल्या. 

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींशी चर्चा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी कॉलवरून चर्चा केली. काश्मीरमधील घटना ऐकून व्यथित झालो. दहशतवादाविरोधातील लढाई अमेरिका भारतासोबत आहे. आमचे भारताला पूर्ण सहकार्य आहे, असेही ते म्हणाले. 

२२ एप्रिल रोजी पहलगामपासून जवळच असलेल्या बैसरन घाटीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केल्याची घटना घडली होती. दहशतवाद्यांनी पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली. यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट आहे.

Web Title: Pahalgam attack: What is America's position on Pakistan now? Ministry of External Affairs gave its response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.