भारताविरुद्ध पहिले अण्वस्त्रांचा वापर न करण्याच्या धोरणातून पाकिस्तान माघार घेऊ शकतो. पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय भाष्यकार नजम सेठी यांनी 'दुनिया न्यूज'शी बोलताना याबाबत भाष्य केले. 'आम्ही भारताला पारंपरिक युद्धात कधीही रोखू शकत नाही. म्हणूनच आपण कधीही 'नो फस्ट यूज' धोरणावर स्वाक्षरी करू नये, असंही ते म्हणाले.
सौदी अरेबियात अवैध स्थलांतरितांविरोधात मोठी कारवाई; आतापर्यंत १० हजार लोकांना देशाबाहेर हाकलले
नजम सेठी यांनी पाकिस्तानी टीव्ही चॅनल दुनिया न्यूजशी बोलताना सांगितले की, पाकिस्तानकडे असलेला अणुबॉम्ब इस्लामिक बॉम्ब नाही. हा भारतविरोधी बॉम्ब आहे. आम्ही आमचा बॉम्ब इस्रायलवर टाकणार नाही, अमेरिकेवरही टाकणार नाही. आमचा बॉम्ब भारतविरोधी आहे. हा एक बचावात्मक बॉम्ब आहे, हा भारतविरोधी बॉम्ब आहे.
"पाकिस्तानने अजूनही भारतासोबत महत्त्वाचा करार केलेला नाही. अणुबॉम्बचा 'नो फस्ट यूज' असा हा करार आहे. भारत आणि आंतरराष्ट्रीय समुदाय पाकिस्तानला त्या करारावर स्वाक्षरी करण्यास सांगतात ज्या अंतर्गत तुम्ही पहिल्यांदा अणुबॉम्ब वापरणार नाही. अनेक देशांनी आपापसात या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत, असंही नजम सेठी यांनी सांगितले.
नजम सेठी यांनी पाकिस्तानची भीती मान्य करत आम्ही बचावात्मक स्थितीत असल्यामुळे अशा कोणत्याही करारावर स्वाक्षरी करू शकत नाही, असे सांगितले. जर आपल्यावर परंपरागत हल्ला झाला तर आपण टिकू शकणार नाही, त्यामुळे आपल्याला संरक्षणासाठी अण्वस्त्रांचा वापर करण्याचा अधिकार आहे. कारण तो आपल्या अस्तित्वाचा प्रश्न बनतो. पण हे भारताच्या धोक्यामुळे आहे. आम्हाला इतर कोणत्याही देशापासून धोका नाही. तसेच हा बॉम्ब इतर कोणत्याही देशासाठी बनवलेला नाही.
यामुळे पाकिस्तानवर नेहमी दबाव राहतो
पाकिस्तानी पत्रकार नजम सेठी म्हणाले की, पाकिस्तानकडे जोपर्यंत अणुबॉम्ब आहे, तोपर्यंत त्यांच्यावर दबाव राहणार आहे. जगातील देशांना भीती वाटते की पाकिस्तान कधीतरी अणुबॉम्ब किंवा त्याचे तंत्रज्ञान एखाद्या इस्लामिक देशाला देऊ शकतो. विशेषतः ज्या इस्लामिक देशांकडे खूप पैसा आहे. त्यामुळे पाकिस्तानवर सतत आंतरराष्ट्रीय दबाव राहतो.
Web Summary : Pakistan may abandon its 'no first use' nuclear policy against India, says Najam Sethi. Their bomb targets India for defense due to conventional warfare weaknesses. Pressure exists due to fears of proliferation to Islamic states.
Web Summary : पाकिस्तान भारत के खिलाफ 'पहले परमाणु हथियार का उपयोग न करने' की नीति से हट सकता है, नजम सेठी का कहना है। उनका बम पारंपरिक युद्ध में कमजोरियों के कारण रक्षा के लिए भारत को लक्षित करता है। इस्लामी देशों को प्रसार के डर से दबाव मौजूद है।