"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:09 IST2025-12-31T11:31:04+5:302025-12-31T12:09:26+5:30
चिनी सैन्याने तैवानच्या सीमांना तीन बाजूंनी वेढा घातला आहे. दोन दिवसांपासून लष्करी सराव करत आहे. या चिथावणीखोर कृती दरम्यान, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी म्हटले आहे की, अमेरिकेने तैवानला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र विक्री केल्याच्या प्रत्युत्तरात, आम्ही निश्चितच तीव्र विरोध करू आणि प्रत्युत्तरात्मक कारवाई करू.

"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
मागील काही दिवसांपासून तैवान आणि चीनमध्ये तणाव वाढला आहे. चीनच्या सैन्याने तैवानला वेढा दिला आहे. चीनने सैन्य सराव सुरू असल्याचा दावा केला आहे. तैवानच्या किनारपट्टीवर चिनी सैन्याच्या कृती युद्धासारख्या आहेत. चीनी सैन्याने लांब पल्ल्याच्या रॉकेटचा मारा केला आहे. प्रत्यक्ष युद्धाचे अनुकरण करण्यासाठी डिझाइन केलेल्या युद्धनौका तैनात करत आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
चीनने तैवानभोवती दोन दिवसांचा लष्करी सराव केला, यामध्ये १० तासांचा लाईव्ह-फायर ड्रिलचा समावेश होता. या सरावांदरम्यान, चिनी सैन्याने तैवानला वेढा घालून त्याच्या मुख्य बंदरांना रोखण्याचा सराव केला. या सरावांमध्ये तैवान आणि त्याच्या मुख्य बंदरांची, कीलुंग आणि काओशुंगची नाकेबंदी देखील समावेश होता.
शक्तीप्रदर्शनासोबतच, चिनी सैन्याने तैवानविरुद्ध इन्फॉरमेशन वॉर देखील तीव्र केले आहे. या मोहिमेचा उद्देश परदेशी लोकांना हे पटवून देणे आहे की तैवानचे सैन्य आणि उपकरणे पीएलए हल्ल्याचा प्रतिकार करण्यास असमर्थ असतील, यासाठी ही मोहिम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी म्हणाले, "तैवानचा मुद्दा हा चीनचा अंतर्गत विषय आहे आणि तो चीनच्या मुख्य हितसंबंधांचा केंद्रबिंदू आहे. तैवान स्वातंत्र्य दलांच्या सततच्या चिथावणीखोर कृती आणि अमेरिकेच्या तैवानला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र विक्रीला प्रत्युत्तर म्हणून, आम्ही निश्चितच ठामपणे विरोध करू आणि प्रतिउत्तरात्मक उपाययोजना करू.
"कायद्यानुसार तैवानचे संपूर्ण एकीकरण साध्य करणे आणि आपल्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करणे हे आपले ऐतिहासिक ध्येय आहे जे आपण पूर्ण केले पाहिजे, असेही चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी म्हणाले. सोमवारी, पीएलएच्या ईस्टर्न थिएटर कमांडने तैवानच्या सभोवतालच्या पाण्यात आणि हवाई क्षेत्रात नौदल जहाजे आणि विमानांचा समावेश असलेले संयुक्त सराव केले.
Several photos showing the launch of long-range rockets as part of the live-fire portion of "Justice Mission 2025" joint exercises around Taiwan.
A total of 27 impacts were reported in the waters around Taiwan, according to the Taiwanese military. pic.twitter.com/Quvek1n1M0— Taiwan Security Monitor (@TaiwanMonitor) December 30, 2025