शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

...अन्यथा युद्ध पुकारू; कचऱ्यावरून कॅनडाला फिलिपिन्सची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 11:51 IST

फिलिपिन्सच्या एका न्यूज पोर्टलने या प्रकरणावर वाचा फोडली होती. कॅनडाने पाच वर्षांपूर्वी जवळपास 100 कंटेनर पाठविले होते.

मनिला : कॅनडाने पाठविलेला कचरा मागे न नेल्यास कशाचीही तमा न बाळगता थेट युद्ध पुकारण्याची धमकीच फिलिपिन्सने दिली आहे. खरेतर 2013 आणि 14 मध्ये कॅनडाने रिसायकल करण्यासाठी कचऱ्याचे काही कंटेनर फिलिपिन्सला पाठविले होते. यामध्ये विषारी कचरा भरला गेल्याचा आरोप फिलिपीन्सने केला आहे. 

फिलिपिन्सच्या एका न्यूज पोर्टलने या प्रकरणावर वाचा फोडली होती. कॅनडाने पाच वर्षांपूर्वी जवळपास 100 कंटेनर पाठविले होते. यामध्ये केवळ प्लॅस्टिक असल्याचे तेव्हा सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात अबकारीच्या अधिकाऱ्यांना त्यांमध्ये घाणेरडे डायपर आणि किचनमधील कचराही मिळाला होता. 

फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतेर्ते यांनी कॅनडाला यावर थेट युद्धाचा इशारा दिला आहे. एका आठवड्यात कॅनडाने त्यांचा अनधिकृत कचरा माघारी न्यावा, अन्यथा कचऱ्याचा डोंगर पाठवून देऊ. फिलिपिन्स आता स्वस्थ बसणार नाही, दोन्ही देशांमध्ये दुश्मनी निर्माण झाली तरी चालेल. आम्ही युद्धाची घोषणा करू. तुम्हाला इच्छा असेल तर हा कचरा तुम्ही खाऊ शकता, अशा शब्दांत त्यांनी कॅनडाला फटकारले आहे. 

तसेच दुतेर्ते यांनी प्रशासनाला आदेश देत एक जहाज तयार ठेवण्यासही सांगितले आहे. या जहाजातून कचरा कॅनडाने मागे न्यावा. अन्यथा हा कचरा पुन्हा कॅनडाला पाठविण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. 

कचऱ्यावर पुर्नप्रक्रिया करण्यावरून फिलिपिन्स आणि कॅनडा हे एकमेकांसमोर उभे राहणे जवळपास निश्चित मानले जात आहे. कॅनडाचे म्हणणे आहे की, हा कचरा एका खासगी कंपनीने पाठविलेला होता, खासगी क्षेत्रावर कॅनडा सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. तर तिकडे फिलिपिन्सच्या न्यायालयाने 2016 मध्येच कचरा पाठविणाऱ्यांना त्यांच्या खर्चाने कचरा मागे नेण्याचे आदेश दिले आहेत. मनिलामधील कॅनडाच्या दुतावासाने मवाळ भुमिका घेत दोन्ही देश या प्रकरणी पर्यावरण हितामध्ये राहून उत्तर शोधत आहेत. लवकरच समस्या सुटेल असा आशावाद व्यक्त केला आहे.

टॅग्स :Canadaकॅनडाwarयुद्धGarbage Disposal Issueकचरा प्रश्न