आदेश! पत्नीचे अनैतिक संबंध, पतीला मिळणार 60 कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 16:43 IST2018-08-01T16:41:12+5:302018-08-01T16:43:02+5:30

जर तुमच्या पत्नीचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असतील, तर पत्नीच्या बॉयफ्रेंडकडून तुम्हाला 60 कोटी रुपये मिळणार आहेत. हे ऐकून नक्कीच कुणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. पण..

Order! Wife's immoral relationship, husbands get 60 crores rupees | आदेश! पत्नीचे अनैतिक संबंध, पतीला मिळणार 60 कोटी रुपये

आदेश! पत्नीचे अनैतिक संबंध, पतीला मिळणार 60 कोटी रुपये

नवी दिल्ली - जर तुमच्या पत्नीचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असतील, तर पत्नीच्या बॉयफ्रेंडकडून तुम्हाला 60 कोटी रुपये मिळणार आहेत. हे ऐकून नक्कीच कुणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. मात्र, अमेरिकेतील कोर्टाने एका व्यक्तीला ही शिक्षा सुनावली आहे. येथील केथ किंगनामक व्यक्तीचा त्याच्या पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर, कोर्टाने या व्यक्तीला 60 कोटी रुपये देण्याचा दंड पत्नीच्या बॉयफ्रेंडला ठोठावला आहे. विशेष म्हणजे दंडाची ही रक्कम पत्नीला न देता, तिच्या पतीला देण्याचे आदेशात म्हटले आहे. 

अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना येथील ही घटना आहे. येथील नॉर्थ कॅरोलिना कोर्टाने हा दंड ठोठावला आहे. या राज्यात अफेअरसंदर्भात एक विशेष कायदा करण्यात आला आहे. केथ किंग नावाच्या एका व्यक्तीने पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. पत्नी डेनियलचा बॉयफ्रेंड फ्रँसिस्को हुजरमुळेच आमचा घटस्फोट झाल्याचे केथ किंगने म्हटले. तसेच फ्रँसिस्कोने गुन्हेगारी भाषा वापरत आम्हा पती-पत्नीमध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोपही केथने केला आहे. केथ आणि डॅनियल यांच्या लग्नाला 6 वर्षे झाले असून त्यांना 5 वर्षाची एक मुलगी आहे. कॅथच्या म्हणण्यानुसार डॅनियलचा बॉयफ्रेंड फ्रँसिस्को तिच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा आहे. तो एका कंपनीत मार्केटींग टूर मॅनेजर असून त्याला दरमहा 57 लाख रुपये पगार मिळतो. 

दरम्यान, नॉर्थ कॅरोलिनामध्ये अनैतिक संबंधासंदर्भात एक कडक कायदा आहे, त्यामुळे कोर्टाने हे प्रकरण गंभीरतेने घेतले आहे. कोर्टाने हे प्रकरण गंभीरपणे घेतले असून याप्रकरणी डॅनियलचा बॉयफ्रेंड फ्रँसिस्कोला दोषी ठरविण्यात आले आहे. तसेच डॅनियलचा पती केथ किंगला 60 कोटी 39 लाख रुपये देण्याचे आदेश फ्रँसिस्कोला दिले आहेत. 
 

Web Title: Order! Wife's immoral relationship, husbands get 60 crores rupees