शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
4
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
5
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
6
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
7
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
8
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
9
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
10
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
11
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
12
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
13
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
15
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
16
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
17
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
18
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
19
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
20
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   

दहा लाख भारतीयांना संधी; युद्धामुळे रशियातील मनुष्यबळ घटले, उद्योगांमध्ये काम करायला कोणी मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 05:46 IST

मनुष्यबळासाठी विविध देशांमध्ये तरुणांचा शोध

मॉस्को : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे रशियातील मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर सीमेवर लढत आहे. त्यामुळे येथे उद्योग क्षेत्रात काम करण्यासाठी कामगारांची टंचाई जाणवत आहे. ही टंचाई भरून काढण्यासाठी रशिया येत्या डिसेंबर २०२५ पर्यंत भारतातून तब्बल दहा लाख कामगारांना नेणार असल्याचे माहिती येथील एका व्यावसायिक नेत्याने दिली. त्यामुळे भारतीयांना तरुणांना परदेशात अधिक पगारात काम करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.

माझ्या माहितीनुसार, या वर्षाअखेरीस भारतातून सुमारे दहा लाख कुशल कामगार रशियामध्ये येणार आहेत. यात स्वेर्दलोव्स्क प्रदेशाचाही समावेश आहे. येकातेरिनबर्ग शहरात नवीन वाणिज्यदूतावास उघडण्यात येणार असून, तो याप्रक्रियेशी संबंधित कामकाज पाहणार आहे, असे उरल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे प्रमुख आंद्रे बेसेदीन यांनी सांगितले.

कमतरता का आहे?युद्धासाठी काही कामगार युक्रेनमध्ये पाठवले गेले आहेत आणि तरुण पिढी कारखान्यांमध्ये काम करण्यास अनिच्छुक आहे. त्यामुळे उत्पादन वाढवण्यासाठी कुशल कामगारांची नितांत आवश्यकता आहे, असे बेसेदिन यांनी सांगितले.

४,००० भारतीयांनी सध्या रशियामध्ये नोकरीसाठी अर्ज केला आहे.

श्रीलंका, उत्तर कोरियातूनही कामगारांना घेऊन जाणार?रशिया भारताशिवाय श्रीलंका आणि उत्तर कोरियामधूनही कामगार आमंत्रित करण्याचा विचार करत आहे, पण ही प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची असल्याचे बेसेदीन यांनी स्पष्ट केले.२०२४ पासूनच भारतीय कामगार रशियातील विविध भागांतील उद्योगांमध्ये काम करतआहेत. कलिनिनग्राडमधील ‘झा रोडिनू’ मासे प्रक्रिया उद्योगाने विशेषतः भारतीय कामगारांना आमंत्रित केले.

रशियाला किती कामगार हवेत? :  रशियाच्या श्रम मंत्रालयाने अंदाज वर्तवला आहे की २०३० पर्यंत देशात सुमारे ३१ लाख कामगारांची कमतरता जाणवेल. यामुळे २०२५ साली परदेशी कुशल कामगारांच्या कोट्यात १.५ पट वाढ करून २.३ लाखांपर्यंत नेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. 

टॅग्स :russiaरशिया