भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 04:56 IST2025-05-08T04:56:20+5:302025-05-08T04:56:38+5:30
Operation Sindoor भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला मंत्रिमंडळातील सदस्य, चारही प्रांतांचे मुख्यमंत्री, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
इस्लामाबाद : भारताने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्या संरक्षण दलांना त्यांनी निवडलेल्या वेळेनुसार, ठिकाण व पद्धतीनुसार प्रत्युत्तर देण्याची परवानगी देण्याचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने बुधवारी घेतला. भारताने केलेल्या हल्ल्यात आमच्या निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला मंत्रिमंडळातील सदस्य, चारही प्रांतांचे मुख्यमंत्री, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने एका निवेदनात म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्रांच्या जाहीरनाम्यातील कलम ५१ नुसार पाकिस्तानला स्वसंरक्षण करण्यासाठी प्रत्युत्तर देण्याचा अधिकार असून तो आम्ही बजावणार आहोत. भारताने पाकिस्तानवर तसेच महिला व मुलांवर हल्ले केले असून ही लाजिरवाणी बाब असल्याचा दावा पाकिस्तानने केला. दहशतवादी तळांवर हल्ला केला हा भारताचा दावा खोटा आहे. प्रत्यक्षात त्या देशाने नागरी वस्त्यांवर हल्ले केल्याने पाकिस्तानातील पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे.
गंभीर परिणामांचा इशारा
पाकिस्तानने असाही कांगावा सुरू केला आहे की, भारताच्या या हल्ल्यामुळे आखाती देशांच्या विमानांना धोका निर्माण झाला आहे. तसेच नीलम-झेलम जलविद्युत प्रकल्पालाही भारताने लक्ष्य केले
आहे.