शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 16:59 IST

भारताने आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी सुरू केलेल्या 'ऑपरेशन सिंधू' मोहिमेत आता नेपाळ आणि श्रीलंकेच्या नागरिकांनाही बाहेर काढले जाणार आहे.

इराण आणि इस्रायल यांच्यातील सध्याच्या संघर्षादरम्यान, भारताने आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी सुरू केलेल्या 'ऑपरेशन सिंधू' मोहिमेत आता नेपाळ आणि श्रीलंकेच्या नागरिकांनाही बाहेर काढले जाणार आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासाने ही माहिती दिली आहे. भारतीय दूतावासाने 'एक्स'वर माहिती देताना म्हटले की, "नेपाळ आणि श्रीलंकेच्या सरकारांच्या विनंतीवरून, इराणमधील भारतीय दूतावासाच्या सुटकेच्या प्रक्रियेत नेपाळ आणि श्रीलंकेच्या नागरिकांचाही समावेश केला जाईल."

यापूर्वी शनिवारी, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिकांना इराणमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. त्यांनी माहिती दिली की, तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबात येथून २१ जून रोजी सकाळी ३:०० वाजता एक विशेष विमान नवी दिल्लीला पोहोचले, ज्यात इराणमधून बाहेर काढलेले भारतीय नागरिक होते. 

जयस्वाल यांनी 'एक्स'वर लिहिले, "ऑपरेशन सिंधू सुरू आहे. अश्गाबात, तुर्कमेनिस्तान येथून एक विशेष विमान २१ जून रोजी सकाळी ०३:०० वाजता नवी दिल्लीला पोहोचले. या उड्डाणासह आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिकांची सुरक्षित वापसी झाली आहे."

नेपाळ आणि श्रीलंकेच्या नागरिकांनाही सुरक्षित बाहेर काढणार!भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांसह नेपाळ आणि श्रीलंकेच्या नागरिकांनाही बाहेर काढण्यासाठी तातडीचे संपर्क क्रमांक आणि एक टेलीग्राम चॅनल जारी केले आहे. दूतावासाने म्हटले आहे की, ज्या कोणत्याही भारतीय, नेपाळी आणि श्रीलंकेच्या नागरिकांना इराणमधून बाहेर निघण्याची इच्छा आहे, त्यांनी तात्काळ दूतावासाशी संपर्क साधावा. यासाठी खालील तातडीचे संपर्क क्रमांक जारी करण्यात आले आहेत: +989010144557, +989128109115, आणि +9891281091091

इराण-इस्रायल संघर्ष काय आहे?१३ जून रोजी इस्रायलने इराणच्या लष्करी आणि अणु ठिकाणांवर एक मोठा हवाई हल्ला केला, ज्याला "ऑपरेशन राइजिंग लायन" असे नाव देण्यात आले. याला प्रत्युत्तर म्हणून इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने "ऑपरेशन टू प्रॉमिस ३" अंतर्गत इस्रायलच्या लढाऊ विमानांच्या इंधन उत्पादन केंद्रांवर आणि ऊर्जा पुरवठा ठिकाणांवर मोठ्या प्रमाणावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. या संघर्षाला आज (२१ जून) नववा दिवस असून, परिस्थिती सातत्याने बिघडत चालली आहे.

टॅग्स :IranइराणIndiaभारतIsraelइस्रायलwarयुद्ध