Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 19:00 IST2025-07-29T18:58:39+5:302025-07-29T19:00:35+5:30
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव'चे यश फक्त दहशतवाद्यांना मारण्यापुरते मर्यादित नाही तर त्यांना ओळखण्यात अचूकता आणि काळजी देखील घेतल्याचे दाखवते.

Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
Operation Mahadev : संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज सभागृहात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'ऑपरेशन संदूर' संदर्भात माहिती दिली. यावेळी शाह यांनी आणखी एक मोठी घोषणा केली. "ऑपरेशन महादेव'मध्ये मारले गेलेले तीन दहशतवादी हेच होते, त्यांनी २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम हल्ला केला होता. पण अनेकांना हेच तेच दहशतवादी आहेत का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका
'ऑपरेशन महादेव'ची यशोगाथा गोळ्यांनी नव्हे तर अन्न आणि निवाऱ्याने सुरू झाली. राष्ट्रीय तपास संस्थेने काश्मीरमध्ये अशा लोकांना आधीच पकडले होते जे दहशतवाद्यांना मदत करत होते. यापैकी काही स्थानिक लोक होते जे दहशतवाद्यांना अन्न, निवारा आणि लॉजिस्टिकल सपोर्ट देत होते. या लोकांची चौकशी करताना ते तीन दहशतवाद्यांना भेटले होते, हे उघड झाले होते. त्यांनी त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती दिली.
ज्यावेळी 'ऑपरेशन महादेव' संपले आणि दहशतवादी मारले गेले, तेव्हा या लोकांना बोलावण्यात आले. त्यांनी मृत दहशतवाद्यांची ओळख पटवली आणि पुष्टी केली की हे तेच लोक आहेत ज्यांना त्यांनी आश्रय दिला होता.
फॉरेन्सिक तपासणीही केली
बंदुका, गोळ्या या सगळ्यांची तपासणी केल्यानंतर हे उघड झाले. यानंतर सुरक्षा दलांचे समाधान झाले नाही. त्यांना शंका पूर्णपणे दूर करण्यासाठी फॉरेन्सिक पुराव्यांची आवश्यकता होती. कारवाईदरम्यान दहशतवाद्यांकडून जप्त केलेल्या दोन AK-47 रायफल आणि एक M9 कार्बाइन तात्काळ चंदीगडमधील केंद्रीय फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मध्ये पाठवण्यात आली.
तिथे तज्ज्ञांनी बॅलिस्टिक चाचण्या केल्या, पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाहून जप्त केलेल्या शेल कॅसिंग्ज आणि प्रोजेक्टाइल्सची तुलना केली. पहाटे ४ वाजता, सीएफएसएलने आपला अंतिम अहवाल दिला, यामध्ये जप्त केलेल्या शस्त्रांमधून चाललेल्या गोळ्या पहलगाम हल्ल्यात वापरल्या गेल्याची पुष्टी केली. या वैज्ञानिक पुराव्यांमुळे कोणत्याही शंकांचे निरसन झाले.
घटनास्थळावर सापडले पुरावे
दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर सुरक्षा दल थांबले नाहीत. भारतीय लष्कर, जम्मू आणि काश्मीर पोलिस, सीआरपीएफ आणि गुप्तचर संस्थांच्या संयुक्त पथकाने तातडीने घटनास्थळाची तपासणी सुरू केली. त्यांनी दहशतवाद्यांचे मृतदेह, शस्त्रे, सॅटेलाईट फोन आणि कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली.