वॉशिंग्टन पोस्टचा मोठा दणका! ३०० हून अधिक पत्रकारांना तडकाफडकी काढलं; शशी थरूर यांच्या मुलालाही डच्चू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 08:53 IST2026-02-05T08:44:53+5:302026-02-05T08:53:37+5:30

जगातील सर्वात प्रतिष्ठित वृत्तपत्रांपैकी एक असलेल्या वॉशिंग्टन पोस्टने त्यांच्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे.

One third of the staff laid off at the Washington Post several prominent figures including Shashi Tharoor son have been dismissed | वॉशिंग्टन पोस्टचा मोठा दणका! ३०० हून अधिक पत्रकारांना तडकाफडकी काढलं; शशी थरूर यांच्या मुलालाही डच्चू

वॉशिंग्टन पोस्टचा मोठा दणका! ३०० हून अधिक पत्रकारांना तडकाफडकी काढलं; शशी थरूर यांच्या मुलालाही डच्चू

Washington Post: जगातील अत्यंत नामांकित वृत्तपत्रांपैकी एक असलेल्या वॉशिंग्टन पोस्टने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. वृत्तपत्राने आपल्या एकूण कर्मचारी वर्गापैकी सुमारे एकतृतीयांश, म्हणजेच ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांना तडकाफडकी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या निर्णयामुळे जागतिक पत्रकारिता क्षेत्रात खळबळ उडाली असून, या मोठ्या कपातीचा फटका काँग्रेस खासदार शशी थरूर यांचे सुपुत्र आणि ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय स्तंभलेखक ईशान थरूर यांनाही बसला आहे.

सुधारणा करण्याच्या नावाखाली कर्मचारी कपात

वॉशिंग्टन पोस्टने ही कर्मचारी कपात पुनर्रचनेचा एक भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे वृत्तपत्राचा क्रीडा विभाग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक ब्युरो आणि पुस्तक  विभागांनाही कुलूप ठोकण्यात आले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मध्य पूर्वेतील संपूर्ण वार्तांकन संघ आणि संपादकांना पदावरून दूर करण्यात आले आहे.

ईशान थरूर यांची भावूक प्रतिक्रिया

गेल्या १२ वर्षांपासून वॉशिंग्टन पोस्टशी जोडले गेलेले ईशान थरूर यांनी एक्सवर रिकाम्या ऑफिसचा फोटो पोस्ट करत आपली भावना व्यक्त केली. "आज आंतरराष्ट्रीय विभागातील माझ्या अनेक सहकाऱ्यांसोबत मलाही वॉशिंग्टन पोस्टमधून कार्यमुक्त करण्यात आले आहे. २०१७ मध्ये वर्ल्डव्ह्यू हे सदर सुरू करणे हा माझ्यासाठी सन्मान होता. आमच्या ५ लाख वाचकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी ऋणी आहे. पत्रकारितेसाठी हा अत्यंत दुर्दैवी दिवस आहे," असं ईशान थरूर म्हणाले.

अनुभवी पत्रकारांना दिला निरोप
या कपातीच्या लाटेत केवळ नवीन कर्मचारीच नव्हे, तर जेरुसलेम ब्युरो प्रमुख गेरी शिह, कैरो ब्युरो प्रमुख क्लेयर पार्कर, युक्रेनमधील युद्धभूमीतून वार्तांकन करणाऱ्या धाडसी पत्रकार लिझी जॉन्सन या अनुभवी पत्रकारांचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त दिल्ली, बीजिंग, कीव आणि लॅटिन अमेरिकेतील अनेक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनाही कामावरून कमी करण्यात आले आहे.

माजी संपादकांकडून कठोर टीका

वृत्तपत्राचे माजी कार्यकारी संपादक मार्टिन बॅरन यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या कृतीचे वर्णन स्वतःचा ब्रँड स्वतःच नष्ट करणे असे केले आहे. दुसरीकडे, सध्याचे कार्यकारी संपादक मॅट मरे यांनी या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले की, "बदलते तंत्रज्ञान आणि वाचकांच्या आवडीनुसार स्वतःला बदलण्यासाठी हा निर्णय असला तरी अपरिहार्य होता."

दरम्यान, सुमारे १५० वर्षांचा वारसा असलेल्या या वृत्तपत्राने घेतलेल्या या निर्णयामुळे लोकशाहीचा स्तंभ कमकुवत होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय आणि क्रीडा क्षेत्रातील वार्तांकन बंद केल्यामुळे जागतिक स्तरावर पत्रकारितेतील नोकऱ्यांच्या असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Web Title : वाशिंगटन पोस्ट ने 300 से अधिक कर्मचारियों को निकाला; थरूर के बेटे भी प्रभावित

Web Summary : वाशिंगटन पोस्ट ने 300 से अधिक कर्मचारियों को निकाला, जिससे शशि थरूर के बेटे ईशान भी प्रभावित हुए। पुनर्गठन के तहत हुई छंटनी से कई विभाग और ब्यूरो बंद हो गए, जिसकी लोकतंत्र को कमजोर करने और पत्रकारिता नौकरियों को खतरे में डालने के लिए आलोचना की गई। अनुभवी पत्रकार भी प्रभावित।

Web Title : Washington Post Cuts 300+ Staff; Shashi Tharoor's Son Dismissed

Web Summary : Washington Post laid off over 300 employees, impacting Shashi Tharoor's son, Ishaan. The cuts, part of restructuring, closed departments and bureaus, drawing criticism for weakening democracy and endangering journalism jobs. Veteran journalists were also impacted.