शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

जपानला 'हगीबिस' चक्रीवादळाचा तडाखा; 73 लाख नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 9:12 AM

जपानला 'हगीबिस' चक्रीवादळाचा तडाखा बसल्याची घटना समोर आली आहे. गेल्या 60 वर्षातील जपानमधील हे सर्वांत शक्तिशाली वादळ असल्याची माहिती मिळत आहे.

ठळक मुद्देगेल्या 60 वर्षातील जपानमधील हे सर्वांत शक्तिशाली वादळ असल्याची माहिती मिळत आहे.वादळामुळे आतापर्यंत एका व्यक्तिचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.'हगीबिस' चक्रीवादळामुळे जपानमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

टोकियो - जपानला 'हगीबिस' चक्रीवादळाचा तडाखा बसल्याची घटना समोर आली आहे. गेल्या 60 वर्षातील जपानमधील हे सर्वांत शक्तिशाली वादळ असल्याची माहिती मिळत आहे. या वादळामुळे आतापर्यंत एका व्यक्तिचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तुफान पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा तडाखा जपानच्या अनेक भागांना बसला आहे. वादळादरम्यान झालेल्या वेगवान वाऱ्याने टोकियोला अक्षरश: झोडपून काढले. 

'हगीबिस' चक्रीवादळामुळे जपानमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत 73 लाख नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. सार्वजनिक ठिकाणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना समोर येत आहेत. जपानमधील रेल्वेसेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. वारा आणि पाऊस यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. जवळपास 30,000 घरांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टोकियोतील सर्व चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल आणि इतर ठिकाणं बंद ठेवण्यात आले आहेत. आपत्कालीन सेवांना दक्ष राहण्यास सांगण्यात आले आहे. चक्रीवादळामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत. 144 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहत असून अनेक घरांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने सुमारे 73 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. वादळाला ‘हगिबीस’ हे नाव फिलीपाईन्सने दिले असून याचा अर्थ 'वेगवान' असा होतो. एका हिंदी वेबसाईटने  याबाबतचे वृत्त दिले आहे. 

नदीजवळ राहणाऱ्या लोकांनी इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाऊन आश्रय घ्यावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. वाऱ्याचा तासाला 144 किलोमीटर वेग आहे. टोकियो आणि उत्तर जपानकडे वारे वाहत असून, अनेक भागांना मोठा तडाखा बसला आहे. जपानच्या हवामान विभागाने टोकियो आणि परिसराला वादळाचा जोरदार तडाखा बसेल असा इशारा दिला होता. शिझुका भागाला 5.3 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. 1958 मध्ये आलेल्या चक्रीवादळानंतरचं हे सर्वांत शक्तिशाली वादळ ठरू शकतं. चक्रीवादळानंतर 1,200 लोकांचा मृत्यू झाला होता.

 

टॅग्स :JapanजपानDeathमृत्यू