शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

एकेकाळी होता प्रसिद्ध न्यूज अँकर, आता उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर विकतोय खाद्यपदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 19:26 IST

Afganistan: रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या प्रसिद्ध टीव्ही अँकरचा फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे. त्याच्या फोटोवर कमेंट करत, त्याला भारतात येण्याचे आवाहन केले जात आहे.

काबूल:अफगाणिस्तानवरतालिबानच्या ताब्यानंतर तेथील परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. देशाची अर्थव्यवस्था तळाला गेली असून, घर भागवण्यासाठी लोकांना मिळेल ते काम करावे लागत आहे. यातच आता एका प्रसिद्ध टीव्ही पत्रकाराची गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की, कुटुंबाचे पोट भागवण्यासाठी त्याला रस्त्यावर खाद्यपदार्थ विकावे लागत आहेत. 

अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझाई यांच्या सरकारमध्ये काम केलेले कबीर हकमाली यांनी ट्विट करुन या पत्रकाराची माहिती दिली आहे. कबीर कमाली याने तीन फोटोही शेअर केले आहेत. एकामध्ये तो पत्रकार स्टुडिओमध्ये अँकरच्या पोजमध्ये बसलेला दिसत आहे. दुसऱ्यामध्ये तो रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थ विकताना दिसत आहे.  कबीर हकमाली यांनी ट्विट केले की- "तालिबानी राजवटीत अफगाणिस्तानमधील पत्रकारांचे जीवन. मुसा मोहम्मदी यांनी अनेक वर्षे अँकर आणि रिपोर्टर म्हणून वेगवेगळ्या टीव्ही चॅनेलमध्ये काम केले. आता त्यांच्याकडे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठीही पैसे नाहीत. रस्त्यावर खाद्यपदार्थ विकून तो पैसे कमावतो. लोकशाही संपल्यापासून अफगाण जनता अभूतपूर्व गरिबीचा सामना करत आहे."

पोस्टवर अनेक कमेंट्सया पोस्टवर अनेक भारतीय लोकांनीही कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले - 'भारताकडून प्रेम आणि काळजी... आशा आहे की भारत सरकार या लोकांना मदत करेल.' दुसर्‍याने लिहिले - 'भारतात या, इथे अधिक संधी आहेत.' याआधी कबीरने ट्विट करून आणखी एका पत्रकाराचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्यांनी एकराम इस्मतीसोबत घडलेला प्रकार सांगितला.  त्यांनी लिहिले - "हा अफगाण पत्रकार एकराम इस्मती आहे. काबूलच्या पीडी 5 येथून तालिबानने त्याचे अपहरण केले होते. त्याला मारहाण आणि अपमानित करण्यात आले. कारण, त्याने जीन्स घातली होती आणि त्याची दाढी केली मुंडली होती. बेकायदेशीरपणे एकरामचा फोन तपासण्यात आला आणि त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली."

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTV Celebritiesटिव्ही कलाकारTalibanतालिबानSocial Viralसोशल व्हायरल