अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 19:13 IST2025-09-18T19:11:25+5:302025-09-18T19:13:15+5:30

Donald Trump Air Force One News : कंट्रोलने प्रवासी विमानाच्या पायलटला मार्ग मोकळा करायला सांगत फटकारले आणि अपघात टळला

On Way To London Donald Trump Air Force One Has Close Encounter With Another Plane Reports | अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...

Donald Trump Air Force One News : गेल्या काही महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सर्वत्र चर्चेचा विषय झाले आहेत. त्यांची टॅरिफ पद्धती आणि मनाला येईल त्याप्रमाणे इतर देशांवर कर लादण्याच्या प्रकारामुळे अमेरिकेतूनही त्यांच्यावर टीका होत आहे. तशातच आज ट्रम्प यांच्याबद्दल एक महत्त्वाची माहिती आली आहे. ट्रम्प यांचे एअर फोर्स वन विमान ब्रिटनला जात असताना अपघातातून थोडक्यात बचावले. ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कवरून उड्डाण करत असताना, एक प्रवासी विमान त्यांच्या विमानाच्या मार्गावरून गेले. दोन्ही विमानांमध्ये हवेत धडक होण्याची शक्यता लक्षात घेऊन तात्काळ अलार्म वाजवण्यात आला. त्यानंतर उड्डाण नियंत्रकांनी (कंट्रोलर) ताबडतोब प्रवासी विमानाच्या पायलटला मार्ग मोकळा करायला सांगत फटकारले आणि अपघात टळला.

एअर कंट्रोलरने कोणत्या सूचना पाठवल्या?

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, ट्रम्प मंगळवारी त्यांची पत्नी मेलानियासह ब्रिटनला रवाना झाले. स्पिरिट एअरलाइन्सचे एक प्रवासी विमान यावेळी त्यांच्याविमानाच्या जवळ आले, ज्यामुळे कंट्रोलरने ताबडतोब स्पिरिट एअरलाइन्सच्या पायलटला विमान वळवून लाईन सोडण्यास सांगितले. फ्लाइट रडारनुसार, ट्रम्प आणि स्पिरिट विमानामध्ये फक्त १२ किलोमीटरचे अंतर होते, ज्यामुळे हवाई नियंत्रण पथक सक्रिय झाले. त्यांनी ताबडतोब स्पिरिट पायलटला सूचना पाठवण्यास सुरुवात केली, त्यांना कळवले की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे ७४७ विमान त्यांच्या रेषेत मागे आहे. मग प्रवासी विमानाला २० अंश उजवीकडे हलवायला सांगण्यात आले. जेणेकरून मागून येणाऱ्या विमानाच्या उड्डाणात अडचण येऊ नये. स्पिरिटच्या प्रवक्त्याने सांगितले की, पायलटने सर्व सूचनांचे पालन केले आणि विमान सर्व प्रवाशांसह सुरक्षितपणे उतरले.

ट्रम्प यांच्याकडे कोणते विमान आहे?

डोनाल्ड ट्रम्प हे २८००० आणि २९००० अशी दोन बोईंग ७४७ विमाने प्रवासासाठी वापरतात. या विमानांसाठी हवाई दलाचे पदनाम VC-25A आहे. ट्रम्पसाठी राखीव असलेल्या विमानाला एअर फोर्स वन असे नाव देण्यात आले आहे, जे एक तांत्रिक पदनाम आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विमानात अमेरिकेचे मानचिन्ह आणि राष्ट्रध्वज लावलेला असतो. या पांढऱ्या विमानाची रेंज अमर्याद आहे आणि ते हवेतही इंधन भरण्यास सक्षम आहे. हल्ला झाल्यास ते मोबाईल कमांड सेंटर म्हणून देखील काम करू शकते.

Web Title: On Way To London Donald Trump Air Force One Has Close Encounter With Another Plane Reports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.