शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
3
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
4
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
7
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
8
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
9
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
10
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
11
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
12
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
13
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
14
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
15
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
16
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
17
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
18
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
19
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
20
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप

बाबो! तब्बल 841 किमीच्या स्पीडने महिलेने कार पळवली; मृत्यूनंतर गिनिज बुकात नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 12:44 IST

40 वर्षांपूर्वी एका महिलेने सर्वात वेगाने कार पळविण्य़ाचे रेकॉर्ड तोडले आहे. हे रेकॉर्ड अमेरिकेची स्टंट वुमन किटी ओनीलच्या नावावर होते. धक्कादायक म्हणजे तिने हे रेकॉर्ड तीन चाकी कारच्या मदतीने 1976 मध्ये केले होते.

ओरेगॉन : एका अमेरिकी महिला रेसिंग ड्रायव्हरला जगात सर्वाधिक वेगाने कार चालविण्याचा विक्रम केल्याने सन्मानित करण्य़ात आले आहे. विशेष म्हणजे तिच्या मृत्यूनंतर तिचे नाव गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये नोंदले गेले आहे. जेसी कांब नावाच्या या महिला रेसरने तब्बल 841 किमी प्रतितास एवढ्या प्रचंड वेगाने कार चालविली होता. यावेळी दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला होता. 

कांबचा मृत्यू 27 ऑगस्ट 2019 ला ओरेगॉनच्या अल्वर्ड डेजर्टमध्ये झाला होता. ती लँड स्पीडचे जागतिक रेकॉर्ड बनविण्याच्या प्रयत्नात होती. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने म्हटले आहे की, 39 वर्षांच्या कांब यांच्या कारने 40 वर्षांपूर्वी एका महिलेने सर्वात वेगाने कार पळविण्य़ाचे रेकॉर्ड तोडले आहे. हे रेकॉर्ड अमेरिकेची स्टंट वुमन किटी ओनीलच्या नावावर होते. धक्कादायक म्हणजे तिने हे रेकॉर्ड तीन चाकी कारच्या मदतीने 1976 मध्ये केले होते. आणखी एक योगायोग म्हणजे हे रेकॉर्ड अल्वर्ड डेजर्ट मध्येच बनविण्यात आले होते. तिने 823 किमी प्रति तास एवढ्या वेगाने तिची तीनचाकी कार पळविली होती. 

कांबच्या नावे हे रेकॉर्ड झाल्यानंतर तीची सहकारी मैत्रिण टॅरी मॅडेन हिने सांगितले की, ज्याच्यासाठी तिने मृत्यूला कवटाळले त्याच्यापेक्षा मोठे रेकॉर्ड या जगात होऊ शकत नाही. हे असे स्वप्न होते जे ती नेहमी पाहत आली होती. मला तिच्यावर गर्व आहे. 

कारच्या चाकाने जीव घेतलातिच्या कारच्या अपघातानंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये तिच्या कारचे चाक नादुरुस्त झाले होते. यामुळे 841 च्या वेगाने असताना हे चाक थांबले. यामुळे कांबच्या कारला अपघात झाला. अमेरिकेच्या हार्नी काऊंटी शेरिफ कार्यालयाने सांगितले की, अपघातावेळी कारचा वेग 800 किमीपेक्षा जास्त होता. अपघातामध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होता. यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे पोस्ट मार्टेम रिपोर्टमध्ये म्हटले आहे. अपघातानंतर तिच्या कारने पेट घेतला होता, मात्र तिला बाहेर काढण्य़ात यश आले होते. 

अन्य महत्वाच्य़ा बातम्या...

बहिष्काराचा धसका! Xiaomi ने दालनांवरील लोगो झाकले; 'Made in India' लिहिले

Coronil: रामदेव बाबांच्या कोरोनिल औषधावर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Unlock1.0 घाम फोडणार! डिझेल पहिल्यांदाच 80 पार; महागाई वाढणार

न भूतो! पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महागले; राजधानीत विक्रम

CoronaVirus बनारसी साड्यांचे कारागीर बनवणार कोविड योद्ध्यांसाठी सुरक्षा कवच!

"रामदेव बाबांना नोबेल द्या"! ट्विटरवर 'कोरोनिल'वरून गट 'सक्रीय'

टॅग्स :guinness book of world recordगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डAmericaअमेरिकाcarकार