बापरे! चर्चमध्ये देवदूताच्या जागी थेट मेलोनींची मूर्ती; इटलीमध्ये नव्या वादाला तोंड! नेमका प्रकार काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 16:43 IST2026-02-02T16:41:36+5:302026-02-02T16:43:46+5:30

एका प्रसिद्ध चर्चमध्ये देवदूताची मूर्ती बसवण्यात येणार होती. मात्र, जेव्हा या मूर्तीचे अनावरण झाले, तेव्हा तिथे देवदूताऐवजी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी मिळतीजुळती आहे.

Oh my God! A statue of Meloni in place of an angel in a church; A new controversy in Italy! What exactly is it? | बापरे! चर्चमध्ये देवदूताच्या जागी थेट मेलोनींची मूर्ती; इटलीमध्ये नव्या वादाला तोंड! नेमका प्रकार काय?

बापरे! चर्चमध्ये देवदूताच्या जागी थेट मेलोनींची मूर्ती; इटलीमध्ये नव्या वादाला तोंड! नेमका प्रकार काय?

इटलीची राजधानी रोममधून एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका प्रसिद्ध चर्चमध्ये देवदूताची मूर्ती बसवण्यात येणार होती. मात्र, जेव्हा या मूर्तीचे अनावरण झाले, तेव्हा तिथे देवदूताऐवजी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी मिळतीजुळती मूर्ती पाहून नागरिक आणि भाविक अवाक झाले. या प्रकरणामुळे संपूर्ण इटलीमध्ये मोठा राजकीय आणि धार्मिक वाद पेटला असून, सरकारने आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

ऐतिहासिक चर्चमध्ये मेलोनी अवतार?

रोममधील प्रसिद्ध सेंट लॉरेंस बेसिलिका चर्चमध्ये दोन देवदूतांच्या मूर्ती बसवण्याचा प्रस्ताव अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. स्थानिक वृत्तपत्र 'ला रिपब्लिका'च्या वृत्तानुसार, या कामासाठी मोठी तयारी करण्यात आली होती. मात्र, मूर्ती तयार झाल्यावर त्यातील एका मूर्तीचा चेहरा हुबेहूब पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासारखा दिसत असल्याने चर्चमध्ये खळबळ माजली.

"मी परी नाही..." मेलोनींनीच उडवली खिल्ली

सोशल मीडियावर या मूर्तीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. मात्र, स्वतः पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी या प्रकारावर मजेशीर प्रतिक्रिया देत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले की, "नाही, मी कोणतीही परी किंवा देवदूत नाही. ही मूर्ती माझी नाही." दरम्यान, वाढता गदारोळ पाहून सरकारच्या धर्म व्यवहार मंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.

"बनवायला गेलो काय आणि बनले काय!"

ही मूर्ती साकारणारे कलाकार ब्रूनो व्हॅलेंटिनेटी यांच्यावर आता संशयाची सुई आहे. व्हॅलेंटिनेटी हे मेलोनी यांच्या पक्षाशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "मी २००० सालापासून या कामावर लक्ष ठेवून आहे. तिथे आधीच एक जुनी मूर्ती होती, पण पाण्यामुळे तिचा चेहरा खराब झाला होता. आम्ही तो चेहरा पुन्हा दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने तो वेगळाच बनला. मी मेलोनींना कधी भेटलोही नाही," असा अजब बचाव व्हॅलेंटिनेटी यांनी केला आहे.

चर्चचे पादरी डॅनियल मिशेलेटी यांनीही यावर आश्चर्य व्यक्त केले असून, "हा चेहरा पंतप्रधानांसारखाच दिसत आहे, ज्यांनी ही मूर्ती बसवली त्यांनाच याचे उत्तर द्यावे लागेल," असे स्पष्ट केले आहे.

Web Title : इटली के चर्च में मेलोनी की मूर्ति से विवाद; जांच के आदेश।

Web Summary : रोम के एक चर्च में देवदूत की जगह इतालवी पीएम मेलोनी जैसी मूर्ति लगने से राजनीतिक और धार्मिक विवाद छिड़ गया। मेलोनी ने इस पर मज़ाक किया, जबकि सरकार ने अजीब घटना की जांच शुरू कर दी है।

Web Title : Meloni statue sparks controversy in Italian church; probe ordered.

Web Summary : A statue resembling Italian PM Meloni, instead of an angel, appeared in a Roman church, igniting political and religious controversy. Meloni joked about it, while the government investigates the bizarre incident.