अमेरिकेमध्ये अनिवासी भारतीय दांपत्याचे मृतदेह सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 16:41 IST2019-02-19T16:40:50+5:302019-02-19T16:41:20+5:30

अमेरिकेच्या टेक्सासमधील राहत्या घरामध्येच अनिवासी भारतीय दांपत्याचे मृतदेह मिळाले आहेत.

NRIs deadbody found in US home | अमेरिकेमध्ये अनिवासी भारतीय दांपत्याचे मृतदेह सापडले

अमेरिकेमध्ये अनिवासी भारतीय दांपत्याचे मृतदेह सापडले

ह्युस्टन : अमेरिकेच्या टेक्सासमधील राहत्या घरामध्येच अनिवासी भारतीय दांपत्याचे मृतदेह मिळाले आहेत. दोघांचाही मृत्यू गोळी लागल्यामुळे झाल्याचे समजते. पोलिसांना प्रथमदर्शनी तपासामध्ये हे प्रकरण हत्या आणि आत्महत्येचे वाटत आहे. दांपत्याच्या मुलीने वडील बेडरूमचा दरवाजा उघडत नसल्याने पोलिसांना फोन केला होता. 

पोलिसांनी घरातून श्रीनिवास नाकिरेकांती (51)  आणि पत्नी शांति नाकिरेकांती (46) यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार श्रीनिवास यांनी प्रथम पत्नीला गोळी मारली आणि त्यानंतर आत्महत्या केली. घटनास्थळावरून एक पिस्तुलही मिळाले आहे. 


या रात्री त्यांची 16 वर्षांची मुलगी झोपली होती. सध्या तिला तिच्या मित्रांकडे पाठविण्यात आले आहे. या दांपत्याला 21 वर्षांचा मुलगाही आहे, जो टेक्सास विद्यापीठात शिकतो, असे तिच्या मित्रांनी सांगितले. 

दांपत्याच्या जवळच्या व्यक्तींनी सांगितले की, त्यांना कोणतीच समस्या नव्हती. दोघांमध्ये वादही नव्हते. या घटनेमुळे धक्का बसला आहे.

Web Title: NRIs deadbody found in US home