आता डास देणार लस! वटवाघळांपासून होणारा निपाह आणि रेबिजचा धोका टळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 06:11 IST2026-03-15T06:11:30+5:302026-03-15T06:11:59+5:30
या प्रयोगांतर्गत डास वटवाघळांना लस टोचतील, ज्यामुळे त्यांच्यातील व्हायरस मानवापर्यंत पोहोचणार नाहीत. यामुळे भविष्यात प्राण्यांमार्फत मानवामध्ये होणारे साथीचे आजार रोखणे शक्य होईल.

आता डास देणार लस! वटवाघळांपासून होणारा निपाह आणि रेबिजचा धोका टळणार
बीजिंग : जगभरातील शास्त्रज्ञ आता जीवघेण्या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी एका अत्यंत अनोख्या तंत्रज्ञानावर काम करत आहेत. निपाह आणि रेबीजसारखे घातक आजार वटवाघळांमार्फत मानवामध्ये पसरण्याचा धोका असतो. हा धोका मुळापासून संपवण्यासाठी आता चक्क डासांचा वापर ‘लस वाहक’ म्हणून करण्याची योजना आखण्यात आली आहे. या प्रयोगांतर्गत डास वटवाघळांना लस टोचतील, ज्यामुळे त्यांच्यातील व्हायरस मानवापर्यंत पोहोचणार नाहीत. यामुळे भविष्यात प्राण्यांमार्फत मानवामध्ये होणारे साथीचे आजार रोखणे शक्य होईल.
तंत्रज्ञानासमोर अनेक आव्हाने
हा प्रयोग यशस्वी दिसत असला, तरी अनेक तज्ज्ञांनी यावर शंका उपस्थित केली आहे. डासांद्वारे लसीकरण नियंत्रित करणे अत्यंत कठीण आहे, कारण डास नक्की कोणाला चावतील हे ठरवणे मानवाच्या हातात नाही. तसेच, ज्या वटवाघळांमध्ये आधीच व्हायरस अस्तित्वात आहे, त्यांच्यात लसीकरणानंतर हा प्रसार खरोखर थांबेल का? याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही.
पर्यायी मार्गांचा विचार सुरू
काही शास्त्रज्ञांच्या मते, डासांऐवजी ‘ड्रिंक स्टेशन’ तयार करणे अधिक सुरक्षित व प्रभावी ठरू शकते. यामध्ये वटवाघळे पाणी पिण्यासाठी येतात त्या ठिकाणी लसीचे मिश्रण असलेले द्रावण ठेवले जाईल. यामुळे वटवाघळांचे लसीकरण अधिक सोप्या पद्धतीने होऊ शकेल. सध्या या तंत्रज्ञानावर अधिक संशोधन सुरू आहे.
कसा केला हा प्रयोग?
या संशोधनामध्ये ‘एडिस इजिप्ती’ जातीच्या डासांचा वापर करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांनी या डासांना असे रक्त पाजले ज्यामध्ये निपाह किंवा रेबीज व्हायरस विरुद्धची लस आधीच उपलब्ध होती. हे रक्त डासांच्या शरीरात गेल्यानंतर त्यातील लस त्यांच्या लाळ ग्रंथींपर्यंत पोहोचली.
प्रयोगशाळेत वटवाघळांना हे डास चाव लेवटवाघळांनी या डासांना खाल्ले, तेव्हा त्यांच्या शरीरात लसीचे अंश पोहोचले. लॅबमध्ये उंदीर व वटवाघळांच्या चाचणीत त्यांच्या शरीरात व्हायरसच्या विरोधात अँटीबॉडीज तयार झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.