बँकॉक - घोटाळे आपल्याला नवीन नाहीत. रोज साध्या ठेकेदारांपासून सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत आणि नगरसेवकांपासून मंत्र्यांपर्यंत अनेकांनी केलेल्या शेकडो घोटाळ्यांबद्दल तुम्ही ऐकले, वाचले असेल. पण कधी विवाह घोटाळ्याबाबत ऐकलंय का. नाही ना? पण थायलंडमध्ये चक्क विवाह नोंदणी घोटाळा उघडकीस आला आहे. याप्रकरणी 27 महिलांसह एका भारतीयाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या महिला बनावट विवाह नोंदणी करून भारतीय पुरुषांसाठी थायलंडमध्ये व्हिसा मिळवून देण्याचे काम करत असत. नॅशनल डेलीने दिलेल्या दिलेल्या वृत्तानुसार भारतीय वंशाच्या विक्रम लेहरीला दलालीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याने त्याने थाई महिलांसोबत भारतीय नागरिकांच्या विवाहांची नोंदणी केली होती. थायलंडमधील इमिग्रेशन ब्युरो प्रमुख आणि टेक्निकल क्राइम सप्रेशन सेंटरचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल सुरचित हाकपाल यांनी सांगितले की, ''अटक करण्यात आलेल्या थाई महिलांना प्रत्येकी आठ ते दहा हजार थाई भाट एवढी रक्कम देऊन कामावर ठेवण्यात आले होते.''दरम्यान, विवाह नोंदणी केलेल्या भारतीय पुरुषांसोबत या महिला कधीही सोबत राहिलेल्या नाहीत. बऱ्याच चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलांपैकी एका महिलेचे वय तर 70 वर्षे आहे.
आता लग्नाचाही घोटाळा, 27 महिलांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 17:00 IST
नगरसेवकांपासून मंत्र्यांपर्यंत अनेकांनी केलेल्या शेकडो घोटाळ्यांबद्दल तुम्ही ऐकले, वाचले असेल. पण कधी विवाह घोटाळ्याबाबत ऐकलंय का?
आता लग्नाचाही घोटाळा, 27 महिलांना अटक
ठळक मुद्देथायलंडमध्ये चक्क विवाह नोंदणी घोटाळा उघडकीस आला आहे. याप्रकरणी 27 महिलांसह एका भारतीयाला अटकअटक करण्यात आलेल्या महिला बनावट विवाह नोंदणी करून भारतीय पुरुषांसाठी थायलंडमध्ये व्हिसा मिळवून देण्याचे काम करत