ड्रग्ज माफिया 'एल मेंचो' लष्करी कारवाईत ठार; सर्मथक बिथरले, रस्त्यावरील वाहने पेटवली, विमानतळावरही हल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 08:33 IST2026-02-23T08:30:40+5:302026-02-23T08:33:06+5:30
मेक्सिकोच्या गुन्हेगारी विश्वातून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. जगातील सर्वात शक्तिशाली आणि क्रूर समजल्या जाणाऱ्या जलिस्को न्यू जनरेशन कार्टेल'चा प्रमुख नेमेसियो रुबेन ओसेगुएरा सर्व्हेंटेस उर्फ एल मेंचो लष्करी कारवाईत मारला गेला आहे.

ड्रग्ज माफिया 'एल मेंचो' लष्करी कारवाईत ठार; सर्मथक बिथरले, रस्त्यावरील वाहने पेटवली, विमानतळावरही हल्ला!
मेक्सिकोच्या गुन्हेगारी विश्वातून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. जगातील सर्वात शक्तिशाली आणि क्रूर समजल्या जाणाऱ्या जलिस्को न्यू जनरेशन कार्टेल'चा प्रमुख नेमेसियो रुबेन ओसेगुएरा सर्व्हेंटेस उर्फ एल मेंचो लष्करी कारवाईत मारला गेला आहे. जलिस्को राज्यातील तपालपा जवळील डोंगररांगांत मेक्सिकन सुरक्षा दलांनी मोठी मोहीम राबवली. एल मेंचोच्या मृत्यूनंतर त्याचे समर्थक बिथरले असून मेक्सिकोच्या ५ राज्यांमध्ये हिंसाचार सुरू झाला आहे. वाहने जाळली जात असून रस्ते रोखले गेले आहेत.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
🚨⚡️ BREAKING: Mexico’s most wanted drug lord killed — violent unrest erupts nationwide
— NEXTA (@nexta_tv) February 22, 2026
Nemesio Oseguera Cervantes, known as El Mencho, was the leader of the Jalisco New Generation Cartel and widely regarded as one of Mexico’s most ruthless criminal figures.
His organization… pic.twitter.com/lBDPId9Ce7
मिळालेल्या माहितीनुसार, ५९ वर्षीय एल मेंचो हा जलिस्को राज्यातील तपालपा या पर्वतीय शहरात लपला असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. ग्वाडालजारापासून ८० मैल अंतरावर असलेल्या या भागात मेक्सिकन लष्कराने मोठी मोहीम राबवली, यात एल मेंचोचा मृत्यू झाला. एल मेंचोच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच त्याच्या कार्टेलने प्रत्युत्तरात्मक हल्ले सुरू केले आहेत. जलिस्को, ग्वानाजुआटो, नायरिट, मिचोआकान आणि तामौलिपास या राज्यांमध्ये बंदूकधाऱ्यांनी रस्त्यांवर उतरून बस, ट्रक आणि खाजगी वाहने पेटवून दिली. अनेक मुख्य महामार्गांवर अडथळे निर्माण करून वाहतूक रोखून धरण्यात आली.
गव्हर्नर पाब्लो लेमस नवारो तातडीने सुरक्षा अलर्ट जारी केला आहे. त्यांनी जनतेला आवाहन केले आहे की, अनेक ठिकाणी संघर्ष सुरू असल्याने खबरदारी म्हणून सार्वजनिक वाहतूक आणि महामार्ग बंद करण्यात आले आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये" एल मेंचोची संघटना अमेरिकेत ड्रग्ज तस्करीचा मुख्य स्रोत होती. त्याच्या मृत्यूनंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मेक्सिकोमधील अमेरिकन दूतावासाने आपल्या नागरिकांसाठी सुरक्षा इशारा जारी केला. जोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत अमेरिकन नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.