२०२४ मध्ये जगात घडू शकतात ह्या मोठ्या घटना, नास्त्रेदेमसने दिलेत भयावह संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 08:16 PM2023-12-31T20:16:15+5:302023-12-31T20:16:40+5:30

Nostradamus Predictions: पुढच्या काही तासांमध्येच २०२३ हे वर्ष सरून २०२४ या नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. या नव्या वर्षासाठी नास्त्रेदेमसने अनेक धक्कादायक भाकितं केली आहेत.

Nostradamus Predictions: These big events can happen in the world in 2024, scary hints given by Nostradamus | २०२४ मध्ये जगात घडू शकतात ह्या मोठ्या घटना, नास्त्रेदेमसने दिलेत भयावह संकेत

२०२४ मध्ये जगात घडू शकतात ह्या मोठ्या घटना, नास्त्रेदेमसने दिलेत भयावह संकेत

पुढच्या काही तासांमध्येच २०२३ हे वर्ष सरून २०२४ या नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. या नव्या वर्षासाठी नास्त्रेदेमसने अनेक धक्कादायक भाकितं केली आहेत. त्यांच्या याआधीच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या झाल्या आहेत. १६व्या शतकातील फ्रेंच तत्त्ववेत्ता असलेल्या नास्त्रेदेमस यांनी त्यांच्या लेस प्रोफेटीज या पुस्तकामधून अशा अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत, ज्यांना आता भविष्यवाण्या म्हटलं जातं. त्यापैकी हिटलरचा उदय, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या, अशा अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. २०२४साठी नास्त्रेदेमसने केलेल्या प्रसिद्ध भविष्यवाण्या पुढीलप्रमाणे आहेत. 

प्रिंस हॅरी राजे बनतील - नास्त्रेदेमस यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की, ब्रिटनचे किंग चार्ल्स तृतीय हे त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर सातत्याने होत असलेल्या आरोपांमुळे राजेपद सोडतील. तसेच प्रिंस विल्यम यांच्याऐवजी प्रिंस हॅरी हे त्यांची जागा घेतील. आइजल्स किंगला बलपूर्वक हटवलं जाईल, असं नास्त्रेदेमसने लिहून ठेवलं आहे. ही भविष्यवाणी किंग चार्ल्स तृतीय यांच्याबाबत आहे, असा लोकांचा दावा आहे. 

चीन फोडणार युद्धाला तोंड - नास्त्रेदेमसने लढाई आणि नौसैनिक युद्धाचीही भविष्यवाणी केली आहे. त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवलंय की, लाल शत्रू भीतीने पिवळा पडेल. तसेच विशाल महासागराला भयभीत करेल. यातील लाल याचा अर्थ चीन आणि नौसैनिक युद्ध म्हणजे तैवानसोबत तणाव, असा, अर्थ सांगितला जात आहे. 

नैसर्गिक आपत्ती - नास्त्रेदेमसने खराब हवामानाच्या घटना आणि जागतिक पातळीवर उपासमारीबाबतही भविष्यवाणी केली आहे. त्यांनी सांगितले की, या काळात मोठा दुष्काळ पडू शकतो.

पोप फ्रान्सिस यांची जागा कुणीतरी अन्य घेईल - नास्त्रेदेमसने त्याच्या भविष्यवाणीमध्ये पोप फ्रान्सिस यांची जागा कुणीतरी अन्य व्यक्ती घेईल, असंही म्हटलं आहे. त्यांनी पुस्तकात लिहिलं आहे की, एका वृद्ध पोंटिफचा मृत्यू होईल, त्यानंतर कमी वयाच्या एका रोमनची निवड होईल. तो दीर्घकाळ गादीवर बसेल. 
 

Web Title: Nostradamus Predictions: These big events can happen in the world in 2024, scary hints given by Nostradamus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.